TRENDING:

आधीच 5 मुलं, बायको सहाव्यांदा आई होणार; पण पोटात असं काही..., सोनोग्राफी रिपोर्ट पाहून नवरा धक्क्यात

Last Updated:

Pregnancy News : जेव्हा मॅक्सिनने घरी प्रेग्नन्सी टेस्ट केली तेव्हा पट्टी इतकी काळी होती की तिला काहीतरी वेगळंच वाटलं. जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिची एचसीजी पातळी इतकी जास्त होती की त्यांनी सांगितलं, ही जुळी मुलं असू शकतात. पण...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पेनसिल्व्हेनियातील रिडिंग येथील जेक यंग आणि मॅक्सिन यंग हे कपल. 5 मुलांचे पालक. दोघं सहाव्यांदा आईबाबा होणार होते. मॅक्सिन प्रेग्नंट होती. पण तिची ही प्रेग्नन्सी शॉकिंग होती. तिची एचसीजी पातळी वाढली होती आणि सोनोग्राफी रिपोर्टनंतर तर धक्क्यावर धक्के मिळाले. मॅक्सिनचा नवरा जेकला मोठा धक्का बसला होता. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात.
News18
News18
advertisement

32 वर्षांचा जेक आणि 30 वर्षांची मॅक्सिन यांचं लग्न 2016 मध्ये झालं. 2017-18 साली त्यांनी चार भावंडांना दत्तक घेतलं. जोएल (आता 10 वर्षे), ज्यूड (8 वर्षे), जेझ (6 वर्षे) आणि जोश (4 वर्षे). त्यानंतर 2019 मध्ये त्यांचा मुलगा जेसी (आता 5 वर्षे) जन्माला आला. 4 दत्तक आणि एक बायोलॉजिकल. अशी एकूण 5 मुलं.  त्यानंतरची प्रेग्नन्सी नैसर्गिक होती, आयव्हीएफ नाही.

advertisement

जेव्हा मॅक्सिनने घरी प्रेग्नन्सी टेस्ट केली तेव्हा पट्टी इतकी काळी होती की तिला काहीतरी वेगळंच वाटलं. जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिची एचसीजी पातळी इतकी जास्त होती की त्यांनी सांगितलं, ही जुळी मुलं असू शकतात. पण जेव्हा अल्ट्रासाऊंड झाली तेव्हा त्याचा रिपोर्ट पाहून सगळ्यांना धक्का बसला.

OMG! गर्भातील बाळाने आपल्याच भावंडांना 'खाल्लं', सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात

advertisement

प्रेग्नन्सीच्या सहाव्या आठवड्यात मॅक्सिनची पहिली अल्ट्रासाऊंड अपॉइंटमेंट होती. जेक पाच मोठ्या मुलांसह घरी होता. त्याला जुळी मुलंच असतील असा फोन येईल अशी अपेक्षा होती. पण मॅक्सिनने त्याला मेसेज केला जो वाचून त्याला धक्का बसला. मॅक्सिनने दोन नाही तर तीन बाळ असल्याचं सांगितलं. जेक म्हणाला, काही मिनिटं माझा श्वासच थांबला. पण ही फक्त सुरुवात होती. काही आठवड्यांनंतर दुसरा अल्ट्रासाऊंड झाला. तेव्हाही जेक मुलांसह घरी आणि मॅक्सिन डॉक्टरकडे. मेसेज आला, "आता तुम्हाला खरोखर धक्का बसेल" जेकला वाटलं की आधीचा रिपोर्ट चुकीचा असेल जुळी मुलंच असतील. पण मॅक्सिनने लिहिलं, "आणखी एक आहे! चार बाळं"

advertisement

डॉक्टरांनी सांगितलं की, हायपरओव्हुलेशनने चार बीज सोडले होते. ही एक दुर्मिळ घटना आहे. प्रत्येक 70 दशलक्ष प्रेग्नन्सीपैकी एक. म्हणून मॅक्सिनला उच्च-जोखीम मानलं जात होतं. तिला बेड रेस्ट आणि नियमित टेस्ट लिहून देण्यात आल्या. जेक म्हणाला, "आम्ही मानसिक तयारी केली होती. पण 4 बाळ अविश्वसनीय!"

Pregnancy News : प्रेग्नंट महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी तसाच ठेवला मृतदेह, पुढे जे घडलं ते...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

30 एप्रिल 2020 रोजी मॅक्सिनवर 30 आठवड्यांनी एमर्जन्सी सिझेरियन झालं. रिडिंग हॉस्पिटलमध्ये तिने 4 बाळांना जन्म दिला. दोन मुली इस्ला, अलिना आणि दोन मुलं रायलन, डेव्हॉन. या कपलने सोशल मीडियावर रिलद्वारे ही बातमी शेअर केली.  जेकने पोस्टमध्ये लिहिलं, "आमचं कुटुंब 7 वरून 11 झालं आहे!"

मराठी बातम्या/Viral/
आधीच 5 मुलं, बायको सहाव्यांदा आई होणार; पण पोटात असं काही..., सोनोग्राफी रिपोर्ट पाहून नवरा धक्क्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल