व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक वृद्ध व्यक्ती दिसते आहे. ही व्यक्ती आपलं नाव, वय आणि ठिकाण सांगते. त्यानुसार या व्यक्तीचं नाव विनोद कुमार आहे, त्यांचं वय 70 वर्षे आहे आणि ते उत्तर प्रदेशात राहणारे आहेत. व्हिडीओत ते सांगतात, मी वयाच्या 70 व्या वर्षी माझा पहिला व्लॉग बनवत आहे. मला व्लॉग कसं करायचं हे माहिती नाही. पण विरंगुळा म्हणून आणि माझा मोकळा वेळ अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमची साथ मला मिळेल अशी आशा आहे.
advertisement
डॉगसोबत रूममध्ये एकटाच होता मुलगा, येऊ लागला विचित्र आवाज; दरवाजा उघडताच किंचाळली आई
उत्तर प्रदेशातील विनोद कुमार यांनी वयाच्या 70 व्या वर्षी सोशल मीडियावर त्यांचा पहिला व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ते व्हायरल झाले. काहीतरी नवीन शिकण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी वय महत्त्वाचं नसतात असं म्हणतात, हे विनोद कुमार यांनी खरं सिद्ध केलं आहे. सोशल मीडियाच्या चमकदार जगात रातोरात मोठ्या प्रभावशाली व्यक्तींनाही त्यांनी मागे टाकलं.
जेव्हा विनोद कुमार यांनी आपला हा पहिला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांचा प्रामाणिकपणा लाखो सोशल मीडिया युझर्सना आवडेल.
19 जानेवारी रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या 47 तासांत त्याला 2.2 कोटींहून अधिक व्ह्यूज आणि 17 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. हजारो लोकांनी कमेंटही केल्या आहेत.सोशल मीडिया युझर्सनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. एका युझरने कमेंट केली, "काका शिकण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही." दुसऱ्याने म्हटलं, "तुमची साधेपणा ही तुमची ओळख आहे." दुसऱ्याने लिहिले, "मी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतो, आजोबा"
@instauncle_9 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आला आहे. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
