सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
एका सोशल मीडिया पोस्टनुसार, या गृहस्थांची 70 वर्षांची पत्नी घरी मिठाई बनवते आणि त्यांचे पती ती ट्रेनमध्ये विकतात. त्यांची मुलगी लंडनमध्ये राहते. एकाकीपणा आणि हताशपणे ते दोघेही जीवन जगत आहेत. एका प्रवाशाने ही मिठाई खाल्ल्यानंतर सांगितले की, "या मिठाईत केवळ चव नाही, तर प्रत्येक घासात त्यांचे प्रेम आणि संघर्ष जाणवतो."
advertisement
वेदांत समूहाचे अध्यक्ष मदतीसाठी पुढे
ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी यावर भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले, "हे खूपच हृदयाला स्पर्श करणारं आहे. कृपया त्यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचा आणि त्यांना मदत करा."
मुलांवर प्रश्नचिन्ह
या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिसाद देत त्यांचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्या मुलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोनिका जसुजा यांनी प्रश्न विचारला, "अशी कोणती मुले आहेत जी या मेहनती माणसाला एकटे सोडतील?" त्यांनी सर्वांना त्यांच्याकडून काहीतरी विकत घेऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन केले.
या जोडप्याच्या संघर्षाची कहाणी केवळ मिठाईपुरती मर्यादित नसून, त्यांच्या हिंमत आणि प्रेमाची साक्ष आहे. प्रवाशांना केवळ मिठाई विकत घेण्याचेच नाही, तर त्यांच्या संघर्षाचा सन्मान करण्याचे आवाहन केले जात आहे.
हे ही वाचा : मुलाला सर्दी खोकला, पालकांनी उपाय म्हणून वापरली अशी गोष्ट, 8 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
हे ही वाचा : बायको शिकलेली असेल तर पोटगी नाही, पण 'अशा' प्रकरणात मिळणार पैसे; कोर्टाच्या आदेशामुळे सगळीकडे चर्चा