advertisement

20 रुपयाच्या VapoRub मुळे 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, नक्की असं काय घडलं? चेन्नईमधील घटनेनं सगळ्यांना हादरवलं

Last Updated:

अलीकडेच असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेन्नईत फक्त 8 महिन्यांच्या बाळाला सर्दी-खोकला झाल्याने त्याच्या आई-वडिलांनी घरगुती उपाय केला, पण त्यामुळे बाळाला आणखी त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : पालक झाल्यानंतर आई-वडिलांना बाळाची सुरुवातीचे काही महिने खूप काळजी घ्यावी लागते. त्यात पहिल्यांदा आई-वडिल झाल्यानंतर दोघांसाठीही सगळ्याच गोष्ट नवीन असतात, त्यामुळे बाळसंबंधीत कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करायला हवा, नाहीतर कधीकधी चुकीच्या निर्णयाची शिक्षा बाळाला होऊ शकते, असंच काहीसं चेन्नईमध्ये ८ महिन्यांच्या बाळासोबत घडलं, ज्यामुळे त्या दांपत्याने आपल्या बाळाला गमावलं आहे.
लहान बाळांना सर्दी-खोकला झाला की बहुतांश पालक घरगुती उपाय सुरुवातील करतात. कुणी मोहरीच्या तेलात लसूण टाकून मालिश करतात, तर कुणी वेगवेगळे नुस्खे आजमावतात. प्रत्येक पालक आपल्या ऐकलेल्या-शिकलेल्या उपायांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की डॉक्टरांचा सल्ला न घेता केलेला एखादा उपाय बाळासाठी जीवघेणा ठरू शकतो?
चेन्नईत फक्त 8 महिन्यांच्या बाळाला सर्दी-खोकला झाल्याने त्याच्या आई-वडिलांनी घरगुती उपाय म्हणून वेपोरब आणि कपूर मिसळून छातीवर लावले. हा उपाय जीवावर बेतला आणि काही वेळातच बाळाची तब्येत बिघडली.
advertisement
डॉक्टरांनी दिली माहिती
पीडियाट्रिशन डॉ. पवन मंडाविया यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेल्या व्हिडिओत सांगितलं की, वेपोरब आणि कपूर लावल्यानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार करूनही त्याला वाचवता आलं नाही.
तज्ज्ञ सांगतात की पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, प्रत्येक घरगुती उपाय बाळांसाठी सुरक्षित नसतो. बाजारात मिळणाऱ्या वेपोरबमध्ये कपूर (Camphor), यूकॅलिप्टस ऑइल (Eucalyptus oil) आणि मेंथॉल (Menthol) हे घटक असतात. हे फक्त 2 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठीच वापरण्याची शिफारस केली जाते.
advertisement
श्वसननलिकेवर होतो परिणाम
कपूर जास्त प्रमाणात वापरल्यास बाळाच्या श्वसननलिकेत इरिटेशन निर्माण होऊ शकते. त्यामुळे श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. यामुळे म्यूकस प्रोडक्शन वाढतं आणि कंजेशन आणखी वाढून बाळाला दम लागण्याचा (सफोकेशनचा) धोका निर्माण होतो. गंभीर अवस्थेत हे जीवघेणं ठरू शकतं.
2 वर्षांखालील मुलांवर वेपरेब वापरू नका
तज्ज्ञांच्या मते, गंभीर परिस्थितीत कपूर मुलांच्या सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर परिणाम करून त्याच्यासाठी धोकादायक बनू शकतो. त्यामुळेच बाजारात मिळणाऱ्या वेपरेबच्या पॅकिंगवर स्पष्ट लिहिलं असतं की ते 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर वापरू नये.
advertisement
पालकांनी ही बाब लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे की, घरगुती उपाय नेहमीच सुरक्षित नसतात. बाळाच्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
20 रुपयाच्या VapoRub मुळे 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, नक्की असं काय घडलं? चेन्नईमधील घटनेनं सगळ्यांना हादरवलं
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement