बँकिंग सिस्टमसाठी वॉर्निंग: “AI पेक्षा हुशार बना”
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह कॉन्फरन्समध्ये बोलताना ऑल्टमॅन यांनी सांगितलं की, सध्याची बँक सुरक्षा प्रणाली AI च्या तुलनेत खूपच कमकुवत आहे. जर वेळेत सुधारणा केल्या नाहीत, तर AI चा वापर करून सायबर गुन्हेगार सहजपणे लोकांच्या खात्यांवर हल्ला करू शकतात. त्यामुळे बँकिंग क्षेत्राने आपली सिस्टम अपडेट करणं अत्यावश्यक झालं आहे.
advertisement
डीपफेक आणि व्हॉइस क्लोनिंग: नवा डोकेदुखीचा विषय
AI वर आधारित डीपफेक व्हिडिओ आणि व्हॉइस क्लोन इतके अस्सल वाटतात की अनेकदा खरे आणि खोट्याचं अंतर समजणं कठीण होतं. पूर्वी सुरक्षित मानलं जाणारं व्हॉइसप्रिंट ऑथेंटिकेशन सुद्धा आता फेल ठरत आहे. ऑल्टमॅन यांच्या म्हणण्यानुसार, पुढील टप्प्यावर फेस रिकग्निशन सुद्धा AI मुळे गोंधळात टाकलं जाऊ शकतं.
Generative AI आता ठगांना स्क्रिप्ट लिहिणं, बनावट कॉल करणं आणि खोटे कागदपत्र तयार करणं यामध्ये मदत करत आहे. ही तंत्रज्ञान गुन्हेगारांना अधिक स्मार्ट आणि घातक बनवत आहे. ऑल्टमॅन यांनी स्पष्टपणे सांगितलं की, फसवणूक आता इतकी स्मार्ट झाली आहे की पारंपरिक सुरक्षा उपाय पुरेसे ठरत नाहीत. त्यामुळे आता AI मार्फत चोरी करणं आता सोपं झालं आहे आणि गुन्हेगार याचा वापर कधीही करु शकतात. त्यामुळे AI ला चोर म्हणणं आता वावगं ठरणार नाही.
