मेघानीनगर येथील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी निवासी भागात विमान कोसळण्याच्या काही क्षण आधी वरिष्ठ पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला एक शॉर्ट एमर्जन्सी कॉल पाठवला.
फक्त पाच सेकंदांचा हा मेसेज कॉकपिटमध्ये पसरलेल्या दहशतीचं चित्रण करतो. ऑडिओमध्ये पायलट असं म्हणत असल्याचं ऐकू येतं, “MAYDAY… MAYDAY… MAYDAY… NO POWER… NO THRUST… GOING DOWN…" याचा अर्थ मेडे...मेडे... वीज नाही...जोर नाही...खाली जातोय..."
advertisement
काय आहे या मेसेजचा अर्थ?
अपघाताच्या आधी पायलटने एटीसी (एअर ट्राफिक कंट्रोल) ला MAYDAY CALL दिल्याचं समजतं. MAYDAY म्हणजे एक इंटरनॅशनल इमर्जन्सी सिग्नल आहे. जर विमान फारच गंभीर अडचणीत असेल अशावेळी MAYDAY CALL दिला जातो जसं की: इंजिन फेल होणं, विमानात आग लागणं, हायजॅकची शक्यता, हवेत दुसऱ्या विमानाशी टक्कर होण्याचा धोका. अशा वेळी पायलट तातडीनं रेडिओवर तीन वेळा "MAYDAY, MAYDAY, MAYDAY" असं उच्चारतो.
Ahmedabad Plane Crash : विमानातील सगळ्यात सुरक्षित सीट, इथं बसल्याने अपघातातही वाचू शकतो जीव
हे केवळ एक अलार्म नाही, तर ‘विमान संकटात आहे आणि तात्काळ मदतीची गरज आहे’ याचा स्पष्ट संकेत असतो. हा संदेश एटीसी, विमानातील क्रू मेंबर्स आणि जवळच्या विमानांना दिला जातो. एकदा मेडे कॉल दिल्यानंतर, पायलट शक्य तितक्या तपशीलात संकटाची माहिती देतो. उदा. कुठला भाग बिघडला आहे, विमान कुठल्या ठिकाणी आहे, आपत्कालीन लँडिंग शक्य आहे का इत्यादी.
कशी झाली दुर्घटना?
12 जून 2025 रोजी दुपारी 1:39 वाजता एअर इंडिया फ्लाइट AI 171 या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाने गुजरातच्या अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. पण टेक-ऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं. त्यात 242 लोक होते. 230 प्रवासी, 10 केबिन क्रू मेंबर्स आणि 2 पायलट.
एलियन पाठवत आहेत मेसेज? अंतराळातून दर 44 मिनिटांनी सिग्नल, पाहून शास्त्रज्ञही शॉक
उंची वेगाने कमी झाल्यानंतर विमान वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळलं. अनेक वैद्यकीय विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी मृत्युमुखी पडले. त्यात प्रवासी, कर्मचारी आणि जमिनीवरील रहिवाशांसह किमान 274 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. जे या विमानातून प्रवास करत होते. फक्त एक प्रवासी जो भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक होता तो वाचला आहे.
अपघाताचं कारण काय?
गुरुवारी रात्री तपासकर्त्यांना एक ब्लॅक बॉक्स सापडला . दुसरा ब्लॅक बॉक्स आणि डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (DVR) शोधण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. ज्यामुळे अपघात कशामुळे झाला याबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकेल. राष्ट्रीय तपास संस्थेसह (NIA) केंद्रीय संस्थांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय पॅनेल स्थापन करण्याची घोषणा केली. हे पॅनेल अपघातास कारणीभूत असलेल्या परिस्थितीचं मूल्यांकन करेल आणि सध्या अस्तित्वात असलेल्या मानक कार्यपद्धती (SOPs) आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे मूल्यांकन करेल