TRENDING:

Airplane Accidents : विमान लॅन्ड झालं आणि भयानक अपघात, फोटो पाहून अंगावर शहारे, किती जणांचे प्राण वाचले असतील?

Last Updated:

कुठेही विमानाचा अपघात अशी बातमी आली, की क्षणभर लोकांच्या मनात प्रश्न उभा रहातो लोक वाचले का? कसा झाला असावा अपघात? वैगरे वैगरे.... सुरक्षित समजला जाणारा हा प्रवास आता अनेकांना धास्तावून टाकत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आजकाल विमान अपघातांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अलीकडे झालेल्या एअर इंडियाच्या मोठ्या अपघातानंतर आता अपघात म्हटलं की लोकांच्या मनात धस्स होतं. कुठेही विमानाचा अपघात अशी बातमी आली, की क्षणभर लोकांच्या मनात प्रश्न उभा रहातो लोक वाचले का? कसा झाला असावा अपघात? वैगरे वैगरे.... सुरक्षित समजला जाणारा हा प्रवास आता अनेकांना धास्तावून टाकत आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अशाच एका घटनेनं सोमवारी जगाचं लक्ष वेधून घेतलं. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचे माईन्स मंत्री लुईस वाटुम कबांबा आणि त्यांच्यासोबत सुमारे 20 लोकांना घेऊन जाणारे चार्टर्ड Embraer ERJ-145LR विमान कोल्वेझी विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघाताला सामोरं गेलं.

advertisement

या विमानाने किन्शासाहून सकाळी सुमारे 11 वाजता लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. पण रनवे 29 वर उतरताना विमान घसरलं आणि थेट पुढे ओव्हरशूट होऊन गेलं. अचानक विमानाच्या टेल सेक्शनला आग लागली आणि काही सेकंदात मागचा अर्धा भाग आगीने वेढला.

advertisement

या घटनेचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये विमान पूर्णपणे जळून कोळसा झाल्याचं दिसतंय; अशात अनेकांना ही भीती होती अशात जीव वाचणं कठीण आहे. पण नशिबाने ऐवढा भयंकर अपघात घडूनही सर्व 20 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

advertisement

व्हायरल व्हिडीओ आणि फोटोमध्ये विमानतळावरील सर्व्हायव्हल फुटेजमध्ये काळा धुराचा प्रचंड लोट आकाशात जाताना दिसतो. मागचा भाग पेटलेला असताना, आपत्कालीन पथकांनी पाण्याच्या फोर्सने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तसेच आग लागताच पुढच्या दरवाजाने प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं.

advertisement

सुदैवाचीच गोष्ट म्हणजे एकाही प्रवाशाला इजा झाली नाही आणि कोणत्याही मृत्यूची नोंद नाही. ज्याच्या फोटो आणि व्हिडिओकडे पाहून वाटतं “कोण वाचलं असेल?” त्या अपघातात सर्वजण सुखरूप बाहेर आले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अबब! चक्क 300अंडी देणारी कोंबडी, कमी खर्चात देतेय बक्कळ कमाई, शेतकऱ्यांची आवडती
सर्व पहा

कांगोचे मंत्री कबांबा आणि त्यांची टीम एका महत्त्वाच्या दौऱ्यावर होती. आठवड्याच्या शेवटी कलोंडो परिसरातील कॉपर माईन कोसळून 30हून अधिक कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर ते तपासासाठी घटनास्थळी रवाना झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, गोळीबाराच्या आवाजानं कामगारांमध्ये पॅनिक निर्माण झाला आणि त्यामुळे खाण कोसळली असल्याचं समोर आलं आहे.

मराठी बातम्या/Viral/
Airplane Accidents : विमान लॅन्ड झालं आणि भयानक अपघात, फोटो पाहून अंगावर शहारे, किती जणांचे प्राण वाचले असतील?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल