TRENDING:

Shocking : विमानावर मधमाशांचा हल्ला, प्रवासी 90 मिनिट राहिले अडकून

Last Updated:

विमानात आणि विमानतळावर कधी काय घडेल काही सांगू शकत नाही. विमान आणि विमानतळावरील अनेक विचित्र घटना समोर येत असतात. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : विमानात आणि विमानतळावर कधी काय घडेल काही सांगू शकत नाही. विमान आणि विमानतळावरील अनेक विचित्र घटना समोर येत असतात. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. सतत घडणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांच्या मनातही आता प्रवास करताना भीती निर्माण होतेय. अशातच आणखी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं. यावेळी समोर आलेल्या घटनेत विमानात चक्क मधमाशा शिरल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
विमानावर मधमाशांचा हल्ला
विमानावर मधमाशांचा हल्ला
advertisement

प्रवाशांचा एकमेकांवर हल्ला, फ्लाइट अटेंडंट आणि प्रवाशांमधील वाद अशा वेगवेगळ्या घटना तुम्ही पाहिल्या, ऐकल्या असतीलच मात्र यावेळी चक्क मधमाशांनी विमानावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय.

मुलीनं धीरेंद्र शास्त्रींना दिला फ्लाईंग किस अन् म्हणाली 'तुम्ही खूप क्युट आहात' Video तुफान व्हायरल

समोर आलेली घटना ब्राझीलची आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, विमानतळावरील प्रवासी मधमाशांच्या हल्ल्यामुळे तासाहून अधिक काळ रस्त्यावर अडकून पडले होते. ग्रेटर नेटल इंटरनॅशनल एअरपोर्टवर एअरलाइनचे व्हॉयपासचे फ्लाइट दुपारी साडेबारा वाजता उतरलं, त्यानंतर विमानातील लोक बाहेरील पायऱ्यांवरून उतरण्याची तयारी करू लागले. मात्र तोच विमानाच्या बाहेर माशांचा आवाज घुमू लागला. विमानाच्या बाहेर संपूर्ण मशपाशांची सेनाच तैनात होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

मधमाशांमुळे प्रवाशांना विमानातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. बाहेर पडल्यावर प्रवाशांच्या जीवाला धोका असू शकतो म्हणून त्यांना जागीच बसण्यासाठी सांगितलं. त्यानंतर पायलटना अग्निशामक विभागाला मदतीसाठी बोलवायला लागलं. या मधमाशांमुळे प्रवासी 90 मिनिट अडकून राहिले. शेवटी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं.

मराठी बातम्या/Viral/
Shocking : विमानावर मधमाशांचा हल्ला, प्रवासी 90 मिनिट राहिले अडकून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल