मुलीनं धीरेंद्र शास्त्रींना दिला फ्लाईंग किस अन् म्हणाली 'तुम्ही खूप क्युट आहात' Video तुफान व्हायरल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बागेश्वर धामचे मठापती धीरेंद्र शास्त्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते लोकांविषयी त्यांच्या समस्या, करिअर याविषयी सांगत असतात. भरपूर लोकांची त्यांच्यावर आस्था असून त्यांच्या दर्शनासाठी, त्यांना भेटण्यासाठी लोक व्याकूळ असतात.
नवी दिल्ली : बागेश्वर धामचे मठापती धीरेंद्र शास्त्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते लोकांविषयी त्यांच्या समस्या, करिअर याविषयी सांगत असतात. भरपूर लोकांची त्यांच्यावर आस्था असून त्यांच्या दर्शनासाठी, त्यांना भेटण्यासाठी लोक व्याकूळ असतात. त्यांचे अनेक व्हिडीओही समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुणी त्यांचं कौतुक करते त्यांना फ्लाइईंग किस देते. यावर त्यांची रिअॅक्शन चांगलीच चर्चेचा विषय ठरतेय.
धीरेंद्र शास्त्री यांचा दौरा छत्तीसगड येथे असून याठिकाणी त्यांचा दरबार भरला आहे. या दरबारातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक तरुणी तिच्या करिअर विषयी चिंतेत असून याविषयी मार्ग शोधण्यासाठी त्यांचा सल्ला घेतेय. मात्र दरम्यान ती त्यांचं कौतुक करते आणि त्यांना फ्लाईंग किस हे खूपच व्हायरल होतंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. तरुणी सुरुवातीला धीरेंद्र शास्त्रींचं कौतुक करते. त्यांना म्हणते तुम्ही खूप क्युक आहात. त्यानंतर ती म्हणते तुम्ही इतके सुंदर कसं काय आहात? यावर शास्त्रीजी म्हणतात यामुळेच मी नेहमी ट्रोल होत असतो. तरुणी तिच्या करिअरविषयीदेखील विचारते. काही वेळानं ती शास्त्रीजींना फ्लाईंग किस देते. यावर शास्त्रीजीही लाजतात.
advertisement
Bageshwar Dham च्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ह व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रियाही येताना पहायला मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2024 4:57 PM IST
मराठी बातम्या/Viral/
मुलीनं धीरेंद्र शास्त्रींना दिला फ्लाईंग किस अन् म्हणाली 'तुम्ही खूप क्युट आहात' Video तुफान व्हायरल









