उत्तर प्रदेशच्या अलिगडमधील हे अजब प्रकरण आहे. पत्नीच्या साबणाने अंघोळ केली म्हणून पतीला अटक करण्यात आली आहे. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कुणाच्याही साबणाने अंघोळ केली म्हणून अटक कशी काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरंतर साबणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की पोलिसांना बोलवावं लागलं.
advertisement
सोनम-मुस्कानची इतकी दहशत! घाबरलेल्या पतीने पत्नीसोबत जे केलं त्याचा तुम्ही विचारही केला नसेल
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये साबणावरून पती-पत्नीमध्ये वाद इतका वाढला की पोलिसांना पाचारण करावे लागले. त्या व्यक्तीने पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे, तर पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि शांतता भंग केल्याबद्दल त्या व्यक्तीवर कारवाई केली आहे. ही घटना कुरसी पोलिस स्टेशन परिसरातील रावण टीला परिसरातील आहे.
संजय गांधी कॉलनीतील रहिवासी प्रवीणचं 13 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. शुक्रवारी सकाळी प्रवीण बाथरूममध्ये आंघोळ करत होता. त्याने पत्नीचा साबण वापरला. यावरून पती-पत्नीत वाद झाला. प्रवीणची आई पुष्पाने सुनेने आपल्या मुलाला विटेने मारल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर प्रवीणने तिला मारहाण केली. सुनेनं आपल्या आईवडिलांना सांगितलं. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलीस घरी आले.
5-5 बायका नवऱ्यासाठी शोधत आहेत सहावी बायको, कारणही अजब
प्रवीणने सांगितलं की मी पोलिसांना बोललो मी येतो, मी पळून जाणार नाही. हे ऐकताच एका पोलिसाने त्याला चापट मारली. म्हणून प्रवीणीने शिवीगाळ गेली. यावरून संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेलं आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. ज्यामुळे त्याच्या बोटाला दुखापत झाली.
तर पोलीस म्हणाले की प्रवीणने पोलिसांशी अपशब्द वापरले. पोलिसांनी तरुणाला मारहाण केलेली नाही. या संदर्भात खोटे आरोप करण्यात आले आहेत.
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार सीओ सर्वम सिंह यांच्या म्हणण्यानुसार पत्नीने आरोप केला होता की पती तिला शिवीगाळ करत होता आणि मारहाण करत होता. शांतता भंग केल्याबद्दल पोलिसांनी तरुणावर कारवाई केली आहे. पती-पत्नी दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.