5-5 बायका नवऱ्यासाठी शोधत आहेत सहावी बायको, कारणही अजब

Last Updated:

Wives search wife for husband : एक अशी व्यक्ती जिच्या एक नाही तर तब्बल 5 पत्नी आहेत. त्याहून मोठा धक्का तुम्हाला तेव्हा बसेल जेव्हा तुम्हाला समजेल की त्याच्या याच 5 पत्नी आता त्याच्यासाठी सहावी बायको शोधत आहेत.

News18
News18
वॉशिंग्टन : आपल्या बॉयफ्रेंडचं किंवा नवऱ्याचं दुसऱ्या कुणा महिलेसोबत संबंध आहेत हे कोणतीच महिला सहन करू शकत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक अशी व्यक्ती जिच्या एक नाही तर तब्बल 5 पत्नी आहेत. त्याहून मोठा धक्का तुम्हाला तेव्हा बसेल जेव्हा तुम्हाला समजेल की त्याच्या याच 5 पत्नी आता त्याच्यासाठी सहावी बायको शोधत आहेत. वाचायलाच थोडं विचित्र वाटतं आहे. यामागील कारणही अजब आहे.
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणारा जेम बॅरेट 30 वर्षांचा आहे आणि व्यवसायाने रेकॉर्डिंग कलाकार आहे. सध्या तो त्याच्या पाच पत्नी कॅमेरून (29 वर्षे), जेसिका (31 वर्षे), रेट (28 वर्षे), गॅबी (30 वर्षे) आणि डायना (30 वर्षे) यांच्यासह एकाच घरात राहतो. जेमचे कॅमेरून आणि जेसिकासोबत 13 वर्षांचे, रेटाशी 8 वर्षांचे, गॅबीसोबत 7 वर्षांचे आणि डायनासोबत 4 वर्षांपासून रिलेशन आहे.
advertisement
जेम 11 मुलांचा बाप आहे
जेमला त्याच्या पाच बायकांपासून एकूण 11 मुलं आहेत. मोठा मुलगा 12 वर्षांचा आहे आणि धाकटा 11 महिन्यांचा आहे. जेमच्या मुलांची नावे एडेन (12 वर्षे), एबेल (11 वर्षे), जेसी (9 वर्षे), अयान (6 वर्षे), जेट (5 वर्षे), जेडी (4 वर्षे), सोफिया (4 वर्षे), ऑक्टाव्हिया (3 वर्षे), बॉबी (2 वर्षे), क्लियो (1 वर्षे) आणि समर (11 महिने) आहेत.
advertisement
आता शोधतोय सहावी बायको
अलीकडेच जेम आणि त्याच्या पत्नींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.  या व्हिडिओमध्ये पाच पत्नींचा एकुलता एक पती जेम आता स्वतःसाठी सहावा जोडीदार शोधत आहे.  तो त्याच्या सहाव्या पत्नीसाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. तो म्हणतो, "हे फक्त नातेसंबंध बनवण्याबद्दल नाही. माझा सहावा जोडीदार असा असावा जो मला आणि माझ्या पत्नींना एका कुटुंबासारखा वाटेल."
advertisement
बायकोही नवऱ्यासाठी शोधत आहे बायको
हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जेव्हा जेमने त्याचा सहावा जोडीदार शोधायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या बायकांना राग आला नाही. उलट सहाव्या जोडीदाराच्या शोधात जेमच्या काही बायका त्याला साथ देत आहेत, पण सर्वच सहमत नाहीत. जेम म्हणाला, "माझ्या एका बायकाने हो म्हटलं, एकीनं नाही म्हटलं आणि बाकीच्या अजूनही विचार करत आहेत. मी सक्ती करणार नाही, सर्वांची संमती आवश्यक आहे."
advertisement
जेमने सहाव्या जोडीदाराचा शोध सुरू केल्यानंतर, अनेक मुलींनी त्यासाठी अर्जही केला आहे आणि त्याच्या पत्नी ते तपासत आहेत. व्हिडिओमध्ये त्या एका मुलीकडे मान हलवत आणि हावभाव करताना दिसत आहेत, तर जेम त्यांच्या मागे उभा आहे. पोस्टचं कॅप्शन असं की, "जर तुम्हाला बॅरेट बनायचं असेल, तर तुम्हाला आमच्या आणि त्याच्याशी व्हिब जुळवावा लागेल."
advertisement
जेम म्हणाला की सहावा जोडीदार त्याच्या आयुष्यातील शेवटचा असेल. यानंतर, तो दुसऱ्या कोणालाही शोधणार नाही. तो म्हणाला, "ही माझी मर्यादा आहे. मला इतर मुलींसोबत बाहेर जाण्याची परवानगी आधीच आहे. सहावी पत्नी म्हणजे नवीन साहस नाही, तर कुटुंब चांगलं बनवणं."
view comments
मराठी बातम्या/Viral/
5-5 बायका नवऱ्यासाठी शोधत आहेत सहावी बायको, कारणही अजब
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement