होय, चीनची राजधानी बीजिंग इथे एका कीटक-थीम असलेल्या संग्रहालयाने एक अजब ड्रिंक लॉन्च केलं आहे.‘कॉकरोच कॉफी’ आणि इंटरनेटवर याच्याच चर्चा सुरू आहेत.
कॉकरोच कॉफी म्हणजे नेमकं काय?
ही कॉफी साधी नाही. तिच्या वरच्या थरावर क्रश केलेल्या कोक्रोचची पावडर टाकली जातो. एवढंच नाही तर यात सुकवलेले पिवळे मीलवॉर्म्स म्हणजेच प्रोटीनयुक्त कीटकही मिसळले जातात.
advertisement
द कव्हर या न्यूज पोर्टलनुसार, ही कॉफी चाखणाऱ्यांचं सांगणं आहे की तिचा स्वाद स्मोकी आणि थोडासा आंबट असतो.
बीजिंगमधील एका कीटक-आधारित थीम असलेल्या संग्रहालयाच्या कॉफी शॉपमध्ये ही कॉकरोच कॉफी विक्रीसाठी उपलब्ध आहे. एका कपची किंमतही साधारण 45 युआन (सुमारे ₹500) आहे. संग्रहालयाचं नाव मात्र जाहीर करण्यात आलं नाही. संग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितलं की जूनच्या शेवटी हा ड्रिंक लॉन्च करण्यात आला आणि अलीकडेच तो इंटरनेटवर जोरदार ट्रेंड होऊ लागला.
फक्त कॉकरोच कॉफीच नाही, तर इतर अजब ड्रिंकही
या ड्रिंक सिरीजमध्ये आणखी विचित्र पेय आहेत, ज्यामध्ये ‘पिचर प्लांट’ (एक कीटकभक्षी वनस्पती) यांच्या पाचक रसातून बनवलेला ड्रिंक असते. तसेच मुंग्यांपासून बनवलेला लिमिटेड एडिशन ड्रिंक हे फक्त हॅलोवीनला उपलब्ध असतं. कर्मचाऱ्यांच्या मते, मुंग्यांचं ड्रिंक आंबट लागतं, तर पिचर प्लांट ड्रिंक साध्या कॉफीसारखं
आरोग्यासाठी सुरक्षित आहेत का कीटक?
संग्रहालयातील कर्मचारी ग्राहकांना खात्री देतात की हे घटक पूर्णपणे सुरक्षित आहेत. सर्व साहित्य पारंपरिक चीनी औषध दुकानातून (Traditional Chinese Medicine – TCM) घेतलेले आहे.
TCM च्या रिसर्जनुसार कॉकरोच पावडर रक्ताभिसरण सुधारण्यासाठी वापरली जाऊ शकते. मीलवॉर्म्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात.
हे पेय कोण पितं?
या अनोख्या कॉफीचा मुख्य ग्राहकवर्ग म्हणजे जिज्ञासू तरुण. मुलांसह येणाऱ्या पालकांना मात्र कॉकरोच आवडत नसल्याने ते हा ड्रिंक टाळतात. प्रत्येक दिवशी या दुकानात सुमारे 10 पेक्षा जास्त कप कॉकरोच कॉफी विकली जाते.
बीजिंगमधील ब्लॉगर चेन शी यांना फॉलोअर्सच्या आग्रहावरून ही कॉफी चाखावी लागली. त्यांनी डोळे बंद करून ती पटकन पिऊन टाकली आणि म्हणाले “अरे, इतकं भयानक तरी नाहीय.” इंटरनेटवर या ड्रिंकवर लोकांची प्रतिक्रिया मिश्र आहेत. काहींना हा आयडिया भन्नाट वाटतो तर काही म्हणतात, “पैसे दिले तरी मी ही कॉफी नाही पिणार”. पण चीनमध्ये अशा विचित्र आणि अपारंपरिक कॉफीज येणं नवीन नाही. तिथे क्रिएटिव ड्रिंक्स नेहमीच चर्चेत राहतात.
