गिरीजा ओकनंतर आणखी एका निळ्या साडीवाल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका ऑफिसमधील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता निळ्या साडीतील ही महिला तिथं येतं. तिच्या आजूबाजूला ऑफिसचे सगळे कर्मचारी उभे आहेत. गाणं वाजतं आणि महिला ठेक्यावर ताल धरते. गायक सुखविंदर सिंग याच्या आवाजातील बन ठन चली बोलो या गाण्यावर ती थिरकताना दिसते.
advertisement
या महिलेने ऑफिसचं वातावरण काही क्षणात पूर्णपणे बदलून टाकलं. ऑफिस फ्लोअरला तिने डान्स फ्लोअरच बनवलं. तिचे एकापेक्षा एक भारी असे मुव्ह्ज पाहून ऑफिसमधीलही इतर कर्मचारीही इम्प्रेस होतात. टाळ्या वाजवून तिचं कौतुक करताना दिसतात. फक्त ऑफिसमधीलच नाही तर हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनाही या महिलेने वेड लावलं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही तिच्या या व्हिडीओला 18 मिलियन म्हणजे तब्बल 1 कोटी 8 लाख व्ह्युज मिळाले आहेत. कोट्यवधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सगळ्यांनी आपल्याला महिलेचा डान्स आवडल्याचं सांगितलं आहे.
व्हिडीओ 18 ऑक्टोबरला पोस्ट करण्यात आलेला आहे. तसंच ऑफिसमध्ये सजावट केल्याचंही दिसतं आहे. म्हणजे ऑफिसमधील दिवाळीच्या कालावधीतील हा व्हिडीओ आहे.
आता ही महिला आहे कोण? तर तशी ही सामान्य महिला. तिच्याबाबत फार माहिती नाही. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा हा ऑफिसमधील डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला. इन्स्टाग्राम पोस्टनुसार तिचं नाव शिखा शर्मा असं आहे. शर्मा जी की बेटी असं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नाव आहे. तिच्या अकाऊंटवर तिच्या डान्सचे असे आणखी काही व्हिडीओ आहेत.
भारतातील या गावात राहतात फक्त आफ्रिकन लोक, खातात गुटखा, बोलतात शुद्ध हिंदी
गिरीजा ओकनंतर ही निळी साडीवाली महिला तुम्हाला कशी वाटली, तिचा हा व्हिडीओ, डान्स तुम्हाला आवडला का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
