अशाच एका प्रेरणादायक घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे, ही कर्नाटकमधील घटना आहे. तिथे अभिषेक नावाचा दहावीचा विद्यार्थी यंदाच्या परीक्षेत नापास झाला. पण त्याच्या आईवडिलांनी जे केलं, ते खरंच एक उदाहरण म्हणून समोर आलं आहे.
अभिषेकला 600 पैकी फक्त 200 मार्क मिळाले. पण घरच्यांनी त्याच्यावर रागवण्याऐवजी, उलट त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याचं ‘फेल सेलिब्रेशन’ केलं! एवढ नाही तर त्याचा केक कापला, सगळ्या कुटुंबाने एकत्र जमून त्याला धीर दिला आणि सांगितलं “तू परीक्षेत नापास झालास, पण आयुष्यात नाही.”
advertisement
अभिषेकचे वडील म्हणाले, “चुकलंय, पण चालेल... पुढच्या वेळी सुधारता येईल. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.”
आजच्या काळात, जेव्हा मुलं फेल झाली की अनेक घरात तणावाचं वातावरण होतं, अशावेळी या कुटुंबाने दिलेला सकारात्मक संदेश खूप मोठा आहे. अशा गोष्टी फक्त एका मुलाला नव्हे, तर अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना नव्याने विचार करायला भाग पाडतात.