TRENDING:

प्लेनच्या टॉयलेटमध्ये टिश्यू! सुरक्षा एजन्सी घाबरल्या, दिवसरात्र तपास, पण प्रकरण काय?

Last Updated:

Indigo Plane Toilet Tissue Paper : हैदराबाद आणि मोहाली दरम्यान धावणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 6E-108 शी संबंधित हे प्रकरण आहे. साफसफाई दरम्यान विमानाच्या शौचालयातून एक टिश्यू पेपर सापडला आणि एकच खळबळ उडाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : टॉयलेट म्हटलं की टिश्यू पेपर आलेच. मग ते कुठलंही असो. त्यामुळे प्लेनच्या टॉयलेटमध्ये टिश्यू सापडले म्हटलं तर त्यात नवल काही नाही. पण प्लेनच्या टॉयलेटमधील याच टिश्यूमुळे खळबळ उडाली आहे. प्लेनच्या टॉयलेटमध्ये टिश्यू सापडला आणि सगळ्या सुरक्षा एजन्सीमध्ये घबराट उडाली आहे. दिवसरात्र तपास सुरू झाला आहे. आता हे नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
News18
News18
advertisement

हैदराबाद आणि मोहाली दरम्यान धावणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 6E-108 शी संबंधित हे प्रकरण आहे. 5 जुलै रोजी हे विमान सकाळी 11:58 वाजता मोहाली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. या फ्लाइटमध्ये 220 प्रवासी आणि 5 केबिन क्रू मेंबर होते. सर्व प्रवासी उतरल्यानंतर, विमानाची साफसफाई सुरू झाली. साफसफाई दरम्यान विमानाच्या शौचालयातून एक टिश्यू पेपर सापडला आणि एकच खळबळ उडाली.

advertisement

Plane Secret : विमानाच्या टेस्टसाठी इंजिनमध्ये टाकतात कोंबडी, पण जिवंतच का, मृत का नाही?

विमानतळ सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, विमानाच्या शौचालयात सापडलेल्या या टिश्यूवर पेपरवर 'विमानात बॉम्ब आहे' असं लिहिले होतं. निर्धारित प्रोटोकॉलचं पालन करून, बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटीला ताबडतोब याची माहिती देण्यात आली. हे विमान दुपारी 12:45 वाजता दिल्लीला रवाना होणार असल्याने विमानाची कसून तपासणी सुरू करण्यात आली.

advertisement

तपासणी दरम्यान विमानात काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही आणि त्याला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर हे विमान दुपारी 2:45 वाजता उड्डाण करू शकलं, जे त्याच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे दोन तास उशिरा होतं.

Ahmedabad Plane Crash : विमानातील सगळ्यात सुरक्षित सीट, इथं बसल्याने अपघातातही वाचू शकतो जीव

इंडिगोचे सुरक्षा व्यवस्थापक मनमोहन सिंग यांच्या तक्रारीवरून, विमानतळ पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. आतापर्यंतच्या तपासानंतर संशयाची सुई इंडिगो एअरलाइन्सच्या काही प्रवाशांवर आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विमानतळ पोलिसांनी 5 जुलै रोजी या विमानातून प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांची यादी एअरलाइन्सकडून मागितली आहे. तसंच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) कडून प्रवाशांशी संबंधित फुटेज मागितले आहे.

advertisement

प्रवाशांपैकी एका प्रवाशाने हे कृत्य केल्याचा विमानतळ पोलिसांना संशय आहे. विमानात असं कुणी आहे का, ज्यांनी ग्रुप बुकिंग केलं आहे आणि फक्त एकच प्रवासी प्रवास करण्यासाठी आला आहे हेदेखील पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठी बातम्या/Viral/
प्लेनच्या टॉयलेटमध्ये टिश्यू! सुरक्षा एजन्सी घाबरल्या, दिवसरात्र तपास, पण प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल