बॉयफ्रेंडला जाड मुली आवडतात म्हणून एका मॉडेलनं चक्क त्याच्यासाठी वजन वाढवलं. एवढंच नाही तर त्यामुळे तिला आपलं करिअरही सोडावं लागलं. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
तो क्लासला जातो म्हणला आणि हुक्का पित बसला, बापानं पाहिलं आणि... संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद
एका मॉडेलनं दावा केला आहे की, तिनं एका महिन्यात 35 किलो वजन वाढवलं. ती म्हटली तिनं हे फक्त प्रियकराच्या आवडीसाठी केलंय. जेव्हा ती तिच्या प्रियकराला भेटली तेव्हा तिचं वजन 50 किलो होतं. मुलानं सांगितलं की जेव्हा ती तिचं वजन वाढवेल आणि लठ्ठ होईल तेव्हा तो तिच्याशी लग्न करेल. त्याच्यावर विश्वास ठेवून, मॉडेलने तिचे वजन वाढवलं, ज्यामुळे तिने मॉडेलिंगची नोकरी गमावली.
advertisement
जेव्हा तिनं तिचं वजन वाढवलं आणि लग्नासाठी तयार झाली तेव्हा तिच्या प्रियकराने तिला सोडून दिलं. मॉडेलला धक्का बसला आहे. सध्या तिनं तिचं वजन कमी करून तिची कहाणी जगासमोर मांडली आहे. सोशल मीडियावर काही लोक त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत तर काही जण तिला खोटं बोलत असल्याचं बोलत आहे.
