तो क्लासला जातो म्हणला आणि हुक्का पित बसला, बापानं पाहिलं आणि... संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
मुलांना मारायला किंवा ओरडायला अनेक पालकांना आवडत नाही. ते मुलांना समजावण्यावर भर देतात; पण काही मुलं खूप खोडकर व व्रात्य असतात. तसंच काही पालकही खूप पटकन रागावतात.
मुंबई, 18 ऑक्टोबर : सध्याची जीवनशैली बदलली आहे. नव्या पिढीमध्ये बदल घडत आहेत. मुलांचा खेळ, अभ्यास, जडणघडण हे सगळंच झपाट्यानं बदलतंय. टीव्ही, मोबाइलचा अतिरेक आणि स्पर्धा यांचा जीवघेणा परिणाम मुलांवर होतोय. यामुळे मुलं व्यसनांच्या आहारी जातायत. मुलांवर लक्ष ठेवणं व त्यांना नीट घडवणं पालकांसाठी आव्हान बनलंय. मुलांच्या व्यसनाधीनतेचा कळस आणि पालकांनी त्यावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया असलेला एक व्हिडिओ सध्या ‘एक्स’वर (ट्विटर) व्हायरल होतोय.
मुलांना मारायला किंवा ओरडायला अनेक पालकांना आवडत नाही. ते मुलांना समजावण्यावर भर देतात; पण काही मुलं खूप खोडकर व व्रात्य असतात. तसंच काही पालकही खूप पटकन रागावतात. मुलांना ते ओरडतात व प्रसंगी मारतातही. मुलंही पालकांचा गैरफायदा घेतात व त्यांना हवं तसं वागतात.
‘एक्स’वर सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ हेच दाखवणारा आहे. यात वडील मुलाची जाम धुलाई करताना दिसत आहेत. वडिलांचा इतका राग पाहून कोणालाही वाईट वाटेल. मुलांना इतकं मारू नये असंही तुम्हाला वाटू शकेल; पण त्यामागचं कारण ऐकलं तर तुम्हाला जास्त वाईट वाटेल. कॅफेमध्ये घुसून मुलाला मारणारे वडील मुलावर अत्यंत नाराज दिसत आहेत. कारण मुलगा त्यांना खोटं सांगून कॅफेमध्ये आला होता. फक्त हेच कारण नाही, तर तो मुलगा ज्या कॅफेमध्ये आला होता, ते हुक्का पार्लर होतं. कोचिंग क्लासला जातो असं सांगून घरून निघालेला मुलगा प्रत्यक्षात क्लासला गेलाच नाही. यामुळेच त्याचे वडील त्याच्यावर चिडले.
advertisement
मुलगा खोटं सांगून हुक्का पिण्यासाठी गेला व वडिलांनी त्याला रंगेहाथ पकडलं. ते पाहून वडील मुलावर भयंकर संतापल्याचं व्हिडिओत दिसतंय. इतकंच नाही, त्यांनी मुलाला चांगलाच मारही दिला. त्याच्या वागण्याबद्दल त्याला बोलणीही बसलेली यात दिसतंय. वडिलांसोबत त्या मुलाची आईही बहुधा तिथे आलेली दिसतेय.
Kalesh b/w b/w parent and there son inside Cafe over the guy was roaming and enjoying with his friends while Smoking hookah by giving Execuse of coaching pic.twitter.com/aptA43Aosn
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 12, 2023
advertisement
सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. तो जवळपास साडेसात हजार जणांनी लाइक केलाय. या व्हिडिओतून मुलांचं बिघडलेलं वर्तन दिसून येतं. पालकांशी खोटं बोलून मुलं चुकीच्या गोष्टी करत आहेत. चांगला समाज घडवण्यासाठी या गोष्टी वेळीच थांबवल्या पाहिजेत; मात्र मुलांच्या अशा वागण्यावर त्यांना सर्वांदेखत चोप देणं हेही चांगल्या पालकत्वाचं लक्षण नाही. समाजातल्या काही जणांमध्ये ते आढळून येतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 18, 2023 12:35 AM IST
मराठी बातम्या/Viral/
तो क्लासला जातो म्हणला आणि हुक्का पित बसला, बापानं पाहिलं आणि... संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद







