उत्तर प्रदेशच्या लखनऊनमधील ही घटना 28 वर्षांची चांदणी तिचा 24 वर्षांचा नवरा प्रदीप गौतम जो पोलीस लाइन्समध्ये सफाई कामगार होता. चांगणीचे 22 वर्षीय बच्चालाल सोबत प्रेमसंबंध होते. पती प्रदीपचा मृत्यू झाला. पण त्यानंतर पत्नी चांदनीच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख नव्हतं.
बायकोचा मृत्यू, 28 वर्षांनी लहान मोलकरणीशी केलं लग्न; त्यानंतर घडलं असं..., कुटुंबात खळबळ
advertisement
पोलिसांना संशय आला. त्यांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले. चांदनीने 10 दिवसात 400 वेळा एका अनोळखी नंबरवर फोन केल्याचं दिसलं. प्रदीपचा मृत्यू झाला त्यादिवशी ती प्रदीप आणि त्या नंबरशी सतत संपर्कात होती. तपासात दुसरा नंबर तिचा प्रियकर बच्चा लालचा असल्याचं समोर आलं.
चौकशीदरम्यान बच्चा लालने सांगितलं, प्रदीपला मारण्याची योजना दिल्लीतच आखण्यात आली होती. लखनऊला परतल्यानंतर चांदनीने त्याला पिस्तूल खरेदी करण्यासाठी 8 हजार रुपये पाठवले. त्यानंतर बच्चा लालने पिस्तूल खरेदी केली. प्लॅनिंगनुसार तो 25 ऑक्टोबरला लखनऊला पोहोचला आणि इटौंजा इथं एक हॉटेल बुक केलं.
बायकोने नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण लोक करतायेत ट्रोल; कारण काय? Watch Video
चांदनीने तिच्या पतीचं ठिकाण सांगण्यासाठी बच्चा लालला वारंवार फोन केला आणि त्याला माहिती देत राहिली. प्रदीप दररोज ममपूर चौकात दारू पिण्यासाठी जात असे. तिथं गेल्यावर बच्चा लाल प्रदीपला भेटत असे आणि दारू देण्याच्या बहाण्याने त्याला गावाजवळील आउटर रिंग रोडवर घेऊन जात असे.
पोलीस तपासात असं दिसून आलं की चांदनी प्रदीपच्या दारूच्या व्यसनाला खूप कंटाळली होती. म्हणून तिने बच्चालालला प्रदीपला मारायला सांगितलं. पण त्याने नकार दिला, बच्चा लालने नकार दिल्यावर चांदनीने धमकी दिली की जर त्याने त्याला मारलं नाही तर ती दुसऱ्या कोणाला तरी मारायला सांगेन. यानंतर बच्चालाल हत्येसाठी तयार झाला. मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
