बायकोने नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण लोक करतायेत ट्रोल; कारण काय? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Birthday Celebration : सामान्यपणे जसं बर्थडे सेलिब्रेशन केलं जातं, तसंच हे करण्यात आलं आहे. त्यात काही वावगं दाखवलं नाही. पण तरी हे कपल ट्रोल झालं आहे?
नवी दिल्ली : बर्थडे म्हटलं की त्या व्यक्तीला विश करणं आलंच. आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला आपण त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा देतो. त्यात काही वावगं नाही. अशीच एक पत्नी जिने तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने नवऱ्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला पण ती ट्रोल झाली.
पती आणि पत्नी हे नातं आणि बर्थडे विश. यात ट्रोल होण्यासारखं काय आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक लाल रंगाची साडी नेसलेली ही सुंदर महिला आणि टी-शर्ट घालून तिच्या समोर उभा असलेला तिचा नवरा. ज्याचा बर्थ डे आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला महिला नवऱ्याच्या टी-शर्टची कॉलर नीट करते. नंतर ती एक पांढरा केक दाखवते ज्यावर 'हॅपी बर्थडे किंग ऑफ माय हार्ट', असं लिहिलेले आहे. त्यानंतर ती त्याला गुलाबांचा गुच्छ देते, ज्यासाठी तो तिला थँक्यू बोलतो, त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू असतं. नंतर दोघंही एकत्र केक कापतात, एकमेकांना भरवतात आणि नंतर जेवतात.
advertisement
एकंदर पाहिलं तर एका रेस्टॉरंटमध्ये या कपलने बर्थडे साजरा केल्याचं दिसतं आहे. तसं व्हिडीओ पाहिलं तर त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही. म्हणजे सामान्यपणे जसं बर्थडे सेलिब्रेशन केलं जातं, तसंच हे करण्यात आलं आहे. त्यात काही वावगं दाखवलं नाही. पण तरी हे कपल ट्रोल झालं आहे? कमेंटमध्ये त्यांच्याबाबत नको नको त्या प्रतिक्रिया येत आहेत.
advertisement
advertisement
दृष्टी दिजिका कलिता नावाच्या महिलेच्या @munnadijika इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. "जर तुम्ही खरोखर मनापासून प्रेम करत असाल तर जगातील शक्ती देखील तुम्हाला वेगळे करू शकत नाहीत", असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
advertisement
पण या कपलच्या वयातील फरक पाहता लोकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. पैशांसाठी हे दोघं एकत्र असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी अश्लील कमेंटही केल्या आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 01, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/Viral/
बायकोने नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण लोक करतायेत ट्रोल; कारण काय? Watch Video


