लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेवाची वाट पाहात बसलेल्या वधूला वराची अशी गोष्ट कळली की तिचा संसार सुरू होताच उद्ध्वस्त झाला. तिने ताबडतोब तिच्या माहेरी धाव घेतली तिच्या पालकांना याची माहिती दिली. यानंतर गदारोळ झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सात फेरे घेऊन सासरच्या घरी पोहोचलेली नवरी आपल्या लग्नामुळे अतिशय आनंदात होती. घरच्यांच्या संमतीने हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र, लग्नानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री असा काही प्रकार घडला की वधूला धक्काच बसला. सुरुवातीला नववधूला विश्वास बसत नव्हता की तिने ज्या व्यक्तीसोबत आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली होती ती व्यक्ती समलिंगी आहे.
advertisement
वधूने तिच्या कुटुंबीयांना सांगितलं, की नवरदेव समलिंगी आहे. यानंतर गदारोळ झाला. आता नववधूने याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. हरिद्वार जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर नववधूने पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. नवविवाहितेनं तिचा नवरा गे असल्याचा आरोप केला आहे. तिचा नवरा रात्री जागून मुलीसारखा मेकअप करायचा. पीडित महिलेचा आरोप आहे की, तिच्या सासरच्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबियांना फसवून लग्न लावलं.
मुलीसोबत ट्रेनमध्ये चढला तरुण; GRP ने विचारलं - कोण आहात दोघं? सत्य समजताच कोचमध्ये खळबळ
वधूने सांगितलं की, यावर्षी तिचं लग्न हरियाणातील यमुनानगर येथील एका तरुणाशी झालं होतं. तिचा नवरा समलिंगी असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर नवविवाहितेचं सारं जगच विस्कटल्यासारखं झालं. लग्नात लाखो रुपये खर्च झाल्याचं वधू आणि तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. मुलाला एक आलिशान कारही देण्यात आली. मुलीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, लग्नात 70 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. लग्नात वराला एक आलिशान कारशिवाय सोन्याचे दागिनेही दिले. लग्नात सासरच्या लोकांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. असं सांगितलं जात आहे, की लग्नापूर्वी वधू आणि वर कधीच भेटले नव्हते. कुटुंबीयांच्या संमतीनंतरच विवाह निश्चित झाला.
लग्नाआधी जेव्हा जेव्हा मुलगी तिच्या भावी पतीला भेटायला बोलवायची किंवा त्याच्याशी बोलायची तेव्हा तो अंतर राखायचा. रात्री लवकर झोपल्याचं कारण सांगून तो मुलीशी बोलणं टाळत असे. वधूचा आरोप आहे, की मुलगा व्हॉईस कॉलवर बोलण्याऐवजी फक्त मेसेजवर चॅट करत असे.
