बिहारमधील हे प्रकरण आहे. 24 वर्षीय दिलीप कुमारचे गेल्या अडीच वर्षांपासून चरपोखरीतील रहिवासी राणीसोबत प्रेमसंबंध होते. पण राणीचं लग्न 27 फेब्रुवारी 2022 रोजी देऊलिया लाख गावातील सोनू चौधरीशी झालं. सोनू हा राणीचा प्रियकर दिलीपचा चुलत भाऊ. सोनू आणि दिलीप लहानपणापासून एकत्र वाढले. सोनू आणि राणीच्या लग्नात दिलीपने आनंदाने नाच केला.
advertisement
7 महिन्यांत 25 वेळा बदलला मूड, सून निघाली अय्याश, सासऱ्यांनी सगळं काही सांगून टाकलं
लग्नानंतर राणी तिच्या सासरच्या घरी आली. 3-4 महिने सगळं व्यवस्थित चाललं होतं. दरम्यान दिलीप आणि राणीमधील जवळीक वाढू लागली. दिलीप त्याच्या वहिनीसोबत जास्त वेळ घालवू लागला. जेव्हा जेव्हा नवरा सोनू घरी नसायचा तेव्हा राणी दिलीपला तिच्या घरी बोलावायची. हे दोन महिने चालू राहिलं. दोघांमधील प्रेम आणि आपुलकी आणखी वाढली. त्यांचं प्रेम इतकं वाढलं की ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते.
राणीचा नवरा सोनूला त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. 6 महिन्यांपूर्वी राणी आणि दिलीपला सोनूने रंगेहाथ पकडलं होतं. दोघांमध्ये खूप वाद झाला. दरम्यान दिलीपने राणीला वचन दिलं की तो तिला ते सर्वकाही देईल जे तिला तिच्या नवऱ्याकडून मिळत आहे. यानंतर राणी तिच्या माहेरी कोयल गावात आली. दिलीप तिला तिच्या माहेरी गुपचूप भेटत असे.
दोनदा लग्न केलं तरी व्हर्जिन राहिली महिला, तिसऱ्यांदा लग्नाआधीच रोमान्स केला अन् घडलं असं की...
एकदा दोघंही एका खोलीत गुपचूप बोलत होते. तेव्हा ग्रामस्थांना याबाबत समजलं. ते राणीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्या खोलीचं दार उघडलं. ग्रामस्थांनी दोघांना रंगेहाथ पकडलं. पंचायत बोलावण्यात आली. एका प्रदीर्घ आणि हायव्होल्टेज ड्रामानंतर गावकऱ्यांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी परस्पर संमतीने दिलीप-राणीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. पण दिलीपने लग्नाला नकार दिला. जेव्हा राणी दिलीपकडे लग्नाचा विषय काढायची तेव्हासुद्धा तो टाळाटाळ करायचा.
दिलीप म्हणाला की, राणीचा घटस्फोट झालेला नाही मग मी लग्न कसं करू शकतो. राणीचा पहिला नवरा सोनू म्हणाला की मी या मुलीला ठेवणार नाही. जर तिला दिलीपशी लग्न करायचं असेल तर मला काहीच हरकत नाही. निर्णय पूर्णपणे राणीवर सोपवण्यात आला. राणीला तिचा प्रियकर दिलीपसोबत राहायचं होतं. मग कोयल गावातील शिव मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार दोघांचं लग्न झालं. लग्नादरम्यान पंचायतीने संमतीपत्रही दिलं.