38 वर्षांची महिला. बंगळुरूतील वसंतनगर भागात राहते. 17 फेब्रुवारीला तिला एक ई-मेल आला. यात एक जाहिरात होती. ज्यामध्ये एका कंपनीनं आपण अतिशय कमी किमतीत अंडी विकत असल्याचा दावा केला. तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त 49 रुपयांना 4 डझन म्हणजे तब्बल 48 अंडी मिळत होती. म्हणजे एक रुपयाला एक अंडं. 5-6 रुपयाला मिळणारं अंडं एक रुपयाला मिळत असेल तर साहजिकच कुणीही ते खरेदी करेल. महिलेनंसुद्धा तेच केलं.
advertisement
महिलेनं सांगितलं की, "जाहिरातीवर शॉपिंग लिंकही देण्यात आली होती. जेव्हा मी त्यावर क्लिक केलं, तेव्हा ते मला एका पेजवर घेऊन गेलं. ज्यामध्ये कोंबडीची वाढ कशी होते, अंडी कशी गोळा केली जातात, कशी वितरित केली जातात. याची माहिती देण्यात आली होती. मी 49 रुपयांना चार डझन अंडी घेण्याचं ठरवलं. ऑर्डर देण्यासाठी पुढे गेलो तेव्हा ते मला संपर्क माहिती पृष्ठावर घेऊन गेलं."
बर्गर खाताय? सावधान! मुंबईत मॅकडोनाल्डसह 30 दुकानांना नोटीस, वाचा कारण
"मी माझ्या कार्डचे तपशील टाकले आणि ऑर्डर देण्यासाठी त्यावर क्लिक केलं. हे मला पुढील पृष्ठावर घेऊन गेलं. जिथं त्यांच्याकडे फक्त क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट पर्याय होता. मी कार्डची एक्सपायर डेट, CVV क्रमांकासह माझे क्रेडिट कार्ड डिटेल्स टाकले आणि पेमेंट करण्यासाठी क्लिर केलं. यानंतर मला माझ्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळाला. पण मी ओटीपी टाकण्यापूर्वी माझ्या क्रेडिट कार्ड खात्यातून एकूण 48,199 रुपये डेबिट झाले होते. हे पैसे 'शाइन मोबाइल एचयू' नावाच्या खात्यात गेले.", असं तिनं सांगितलं.
अंड्याच्या किमतीच्या दहापट रक्कम तिच्या खात्यातून गेली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याने इतके पैसे गमावले आणि तरीही अंडी मिळाली नाहीत. स्वस्तात अंडी विकत घेण्याच्या प्रयत्नात महिला घोटाळ्याची शिकार झाली. आपल्यासोबत फ्रॉड झाल्याचं तिला समजलं.
समोसा आवडत असेल तर सावधान, 'या' देशात जाऊन खाल तर शिक्षा भोगाल, कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
महिलेला बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातील अधिकाऱ्यांकडून पैसे भरण्याबाबत कॉल आला आणि नंतर सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी तिला स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. तिनं सांगितलं, “मी त्यांना फसवणुकीबद्दल सांगितलं आणि त्यांनी माझं खातं ब्लॉक केलं. मी सायबर क्राईम हेल्पलाइन (1930) वर कॉल केला आणि त्यांनी मला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला सांगितलं"
महिलेनं जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
