समोसा आवडत असेल तर सावधान, 'या' देशात जाऊन खाल तर शिक्षा भोगाल, कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
सामोसा ही मूळ भारतीय पाककृती मानली जाते. कालांतराने भारतातून तो अन्य देशांमध्ये बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. आता काही देशांमध्ये सामोसा तर खूप आवडीने खाल्ला जातो.
मुंबई : कधी बदल म्हणून सकाळच्या नाश्त्यामध्ये, अगदीच वेळ पडली तर दुपारच्या पूर्ण जेवणाऐवजी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर चटपटीत काही तरी खावंसं वाटतं त्यात सामोसा हा पदार्थ अनेकांच्या आवडीच्या मेन्यूच्या यादीत प्राधान्यक्रमावर असतो. भारतात सगळ्या प्रांतांमध्ये सामोसा करण्याची पद्धत थोड्याफार फरकानं निराळी असली, तरी हा पदार्थ सगळ्यांना प्रिय आहे; पण या जगाच्या पाठीवर असा एक देश आहे जिथं म्हणे सामोसा खाण्यावर बंदी आहे! या संदर्भात अधिक जाणून घेऊ या.
सामोसा या पदार्थाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तो आहे 16 व्या शतकातला. असं सांगितलं जातं, की 16व्या शतकात मुघल काळात या पदार्थाचा उल्लेख आढळतो. सामोसा ही मूळ भारतीय पाककृती मानली जाते. कालांतराने भारतातून तो अन्य देशांमध्ये बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. आता काही देशांमध्ये सामोसा तर खूप आवडीने खाल्ला जातो.
advertisement
भारतातल्या खवय्यांची सामोशाला नेहमीच पहिली पसंती असते. भारतात तरी सामोसा हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. घरी पाहुणे आले तर किंवा संध्याकाळची भूक शमवण्यासाठी, कधी तरी सकाळच्या चहाबरोबरसुद्धा भारतात सामोसा खाल्ला जातो. याचं बाहेरचं आवरण मैद्यापासून केलं जातं आणि आतमध्ये कांदा, बटाटा, मटार, भरपूर कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची यांची पेस्ट, काही प्राथमिक मसाले वापरून भाजी तयार केली जाते. मैद्याच्या छोट्या पोळीचा त्रिकोणी आकार करून त्यात हे सारण भरून सामोसा मंद आचेवर खुसखुशीत तळला जातो.
advertisement
या देशात तुम्ही सामोसा खाऊ शकत नाही
दक्षिण आफ्रिकेतल्या सोमालिया या देशामध्ये सामोसा खाण्यावर बंधनं घालण्यात आली आहेत. त्या देशात एखाद्या व्यक्तीनं सामोसा तयार केला, खाल्ला किंवा विकला तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तिथे प्रत्येक जण सामोसा खाणं किंवा तयार करण्याला घाबरतो. एखाद्या व्यक्तीला सामोसा कितीही आवडत असेल तरी त्याला आपल्या इच्छेला मुरड घालून तिथे राहावं लागतं.
advertisement
बंदी येण्याचं कारण
view commentsसोमालियामध्ये सामोसा खाण्यावर बंदी येण्याचं कारणसुद्धा फारच आश्चर्यकारक आहे. सोमालियामधला कट्टरपंथी समुदाय असं मानतो, की सामोशाचा त्रिकोणी आकार हा ख्रिस्ती समाजाच्या खूप निकटचा आहे. काही अहवालांमधून असा दावा करण्यात आला आहे, की तिथे उपासमारीनं मेलेल्या जनावरांचं मांस सामोशामध्ये वापरलं जात असे. अशीही एक गोष्ट समोर आली आहे, की सामोशाचा आकार हा आक्रमकता व्यक्त करणारा आकार आहे. त्यामुळे सोमालियात सामोशावर बंदी घालण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2024 9:57 PM IST
मराठी बातम्या/Viral/
समोसा आवडत असेल तर सावधान, 'या' देशात जाऊन खाल तर शिक्षा भोगाल, कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करेल


