TRENDING:

Python : अजगराच्या पाठीवर बसून खेळतोय लहानगा, अचानकच पोहोचला तोंडाजवळ आणि... अंगावर काटा आणणारा Video

Last Updated:

हा थरारक व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून हजारोंनी लाईक केलाय. काही युजर्सनी हा साहसाचा भाग म्हणून बघितला असला तरी अनेकांनी या मुलाच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : साप म्हटलं की अनेकांना भीती वाटते. अजगरासारखा महाकाय साप समोर आला तर बहुतेकजण तिथून पळ काढतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. या व्हिडीओत एक लहान मुलगा अजगरासोबत अगदी मस्त खेळताना दिसतोय.
अजगराचा धक्कादायक व्हिडीओ
अजगराचा धक्कादायक व्हिडीओ
advertisement

इंस्टाग्रामवर 4_motivation.__ या युजरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक लहानसा मुलगा मोठ्ठ्या अजगराच्या पाठीवर बसलेला दिसतो. अजगर पुढे सरकतो तसतसा मुलगाही त्याच्या पाठीवरून पुढे सरकत राहतो अगदी लहान मुल एखाद्या खेळण्यासोबत खेळतात, तसाच तो त्या अजगरासोबत खेळताना दिसत आहे. काही वेळात तो मुलगा अजगराच्या पाठीवरुन खाली घसरतो आणि मग पुन्हा धावत जाऊन थेट त्याच्या तोंडाजवळ जातो. विशेष म्हणजे, तो त्याचा फण पकडतो आणि हसत राहतो जणू काही तो साप नाही, तर एखादं खेळणं आहे. आश्चर्य म्हणजे तो हे सगळं करत असताना कोणीतरी ही घटना आपल्या फोनमध्ये टीपत आहेत.

advertisement

हा थरारक व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून हजारोंनी लाईक केलाय. काही युजर्सनी हा साहसाचा भाग म्हणून बघितला असला तरी अनेकांनी या मुलाच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे.

अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये घडली होती. तिथं मुलांच्या गटाने 15 फूट लांब ‘भारतीय रॉक पाइथन’ला खेळण्यासारखं हाताळलं होतं. त्यांनी त्यासोबत सेल्फी घेतली, रील्स बनवल्या आणि नंतर जंगलात सोडलं. त्याचाही व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Python : अजगराच्या पाठीवर बसून खेळतोय लहानगा, अचानकच पोहोचला तोंडाजवळ आणि... अंगावर काटा आणणारा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल