द लॅन्सेटच्या एका नवीन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानवी शरीर आता उष्णतेला बळी पडत आहे. 1990 च्या तुलनेत उष्णतेशी संबंधित मृत्यूंमध्ये 23% वाढ झाली आहे. आज फक्त तीव्र उष्णतेमुळे दरवर्षी अंदाजे 54.6 दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात. नवजात शिशु आणि वृद्धांना सर्वात जास्त फटका बसतो, काही ठिकाणी 20 दिवसांपर्यंत जीवघेण्या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. भारतासारख्या देशांमध्ये, 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आता सामान्य झालं आहे.
advertisement
बापरे! 425 वर्षांपूर्वीचं ते संकट पुन्हा येतंय? शास्त्रज्ञांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी
हवा फक्त श्वास नाही तर विष
लॅन्सेटच्या अहवालात असंही दिसून आलं आहे की हवा आता जीवन देत नाही, तर ती आयुष्य हिरावून घेत आहे. प्रदूषणामुळे दरवर्षी 70 लाखांहून अधिक अकाली मृत्यू होतात. डॉक्टरांचं म्हणणं आहे की केवळ फुफ्फुसच नाही तर संपूर्ण शरीर आता धुराने भरलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) डॉ. जेरेमी फरार यांच्या मते, हा आता भविष्यातील धोका नाही, तर आजचं संकट आहे. उष्णतेतील प्रत्येक वाढ, धुरातील प्रत्येक वाढ, प्रत्येक कोरडी जमीन एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.
दुष्काळ, उपासमार आणि जळणारी पृथ्वी
लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, 2023 मध्ये 124 दशलक्ष लोक उपासमार आणि कुपोषणाने ग्रस्त होते. हे केवळ वाढत्या दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांमुळे आहे, ज्यामुळे शेती नष्ट होत आहे. जिथं एकेकाळी धान्याची शेतं होती, तिथं आता भेगा पडल्या आहेत. जिथं एकेकाळी नद्या वाहत होत्या, तिथं आता राख आहे. आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेसारख्या भागात भूक आणि स्थलांतर ही आता सामान्य गोष्ट बनली आहे. एकेकाळी हवामान बदल हा एक पाठ्यपुस्तकातील शब्द मानणारे लोक आता रिकाम्या पोटी त्याचा अनुभव घेत आहेत.
अंतराळात सोडलेले सॅटेलाइट दररोज पृथ्वीवरच धडाधड कोसळतायेत, शास्त्रज्ञही घाबरलेत; धरती धोक्यात
तापमानाने अब्जावधी रुपयांची कमाई हिरावून घेतली
अहवालानुसार 2024 मध्ये जगाचे 640 अब्ज कामाचे तास फक्त उष्णतेमुळे वाया गेले. याचा अर्थ अंदाजे 1.09 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची उत्पादकता संपली. वृद्धांमधील मृत्यू आणि वैद्यकीय खर्चाशी संबंधित नुकसान 261 अब्ज डॉलर्स इतकं झालं. शिवाय 2023 मध्ये देशांनी जीवाश्म इंधनांसाठी अनुदानावर 956 अब्ज डॉलर्स खर्च केले, जे या संकटाचं मूळ इंधन आहे. 15 देशांनी त्यांच्या आरोग्य बजेटपेक्षा कोळसा आणि तेल वाचवण्यासाठी जास्त पैसे खर्च केले.
आशेचा प्रकाश कुठे आहे?
हा अहवाल भयावह आहे, पण तो आशाही देतो. 2010 ते 2022 दरम्यान कोळशाच्या वापरात घट झाल्यामुळे दरवर्षी 1,60,000 लोकांचे जीव वाचले. आज अक्षय ऊर्जेमुळे जगातील 12% वीज निर्माण होते आणि 1,60,000 नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. लॅन्सेट काउंटडाउनच्या कार्यकारी संचालक डॉ. मरीना रोमेनेलो यांच्या मते, "उपाय आपल्या आवाक्यात आहेत. आपल्याकडे फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे. जर आपण आता बदललो नाही तर आपण आपलं भविष्य स्वतःच उद्ध्वस्त करू"
