हे ठिकाण आहे आफ्रिकेतील इथिओपिया हा देश. इथले लोक अजूनही 2017 मध्ये जगत आहेत. यामागील कारण म्हणजे इथिओपियाचे गीझ कॅलेंडर, ज्याला कॉप्टिक कॅलेंडरदेखील म्हणतात. जे उर्वरित जगाच्या ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सात वर्षे मागे आहे.
सामान्यपणे कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात. पण गीझ कॅलेंडरमध्ये 13 महिने असतात. त्यापैकी 12 महिन्यांत प्रत्येकी 30 दिवस असतात आणि शेवटचा महिना ज्याला 'पॅग्युम' म्हणतात, त्यात 5-6 दिवस असतात, जे लीप वर्षात बदलतात.
advertisement
इथिओपियन कॅलेंडर सात वर्षे मागे राहण्याचं कारण म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मतारखेच्या गणनेतील फरक. जगभरातील बहुतेक देशांमध्ये, येशू ख्रिस्तांचा जन्म इसवी सन 1 मध्ये झाला असं मानलं जातं, तर इथिओपियन ऑर्थोडॉक्स चर्चनुसार, त्यांचा जन्म इ.स.पूर्व 7 मध्ये झाला. इथिओपियन कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सात ते आठ वर्षे मागे राहण्याचं हेच कारण आहे.
इथं 25 डिसेंबरऐवजी 7 जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. इथिओपियाचे नवीन वर्ष 11 सप्टेंबर रोजी साजरं केलं जातं, तर लीप वर्षात ते 12 सप्टेंबर रोजी असते. हा पावसाळा संपण्याचा आणि फुलांचा बहर येण्याचा काळ असतो, जो एका नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. याशिवाय, या सणांच्या तारखा पूर्णपणे गीझ कॅलेंडरच्या आधारे ठरवल्या जातात.
Taj Mahal Facts : ताजमहालभोवती तुळशीची रोपं का लावली आहेत?
इथिओपिया हा आफ्रिकेतील एकमेव देश आहे जो कधीही कोणत्याही युरोपीय सत्तेने वसाहत केला नाही. म्हणूनच त्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आजही जिवंत आहेत. गीझ कॅलेंडर हे केवळ वेळ मोजण्याची प्रणाली नाही, तर इथिओपियाच्या संस्कृती, धर्म आणि अभिमानाचे प्रतीक आहे.
तरी ग्रेगोरियन कॅलेंडर जागतिक स्तरावर वापरला जात असल्याने, इथिओपियन लोक दोन्ही कॅलेंडर वापरतात. आंतरराष्ट्रीय व्यापार, शिक्षण आणि सरकारी कामांसाठी ग्रेगोरियन कॅलेंडर वापरला जातो, तर धार्मिक कार्यांसाठी गीझ कॅलेंडरचा वापर केला जातो.
