यूकेच्या केंट इथं राहणारी 27 वर्षीय बेथानी रोड्स शाळेत शिक्षिका आहे. 29 वर्षीय कॉनर बर्न्ससोबत ती 9 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता दोघंही या वर्षी ऑगस्टमध्ये लग्न करणार आहेत. त्यांच्या उत्साहाला पारावर नाही. लग्नाआधी त्यांनी हनीमूनची प्लॅनिंग केली आहे.
हनीमूनसाठी त्यांनी टान्झानिया आणि झांझिबारला एक ट्रिप प्लॅन केली आहे, ज्याच्या तिकिटाची किंमत 13 हजार डॉलर्स म्हणजे तब्बल 11 लाख रुपये आहे. पण आता बेथानीला तिच्या हनिमूनला जाण्याची भीती वाटतेय. याचं कारण आहे तिला असलेली अॅलर्जी. जी इतकी धोकादायक आहे की ती त्याचा जीवही घेऊ शकते.
advertisement
सकाळी जाग आली तेव्हा कुत्रा बायकोसोबत..., दृश्य पाहून नवरा हादरला, बनवला Video, लाखो लोकांनी पाहिला
न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, केनेडी न्यूज अँड मीडियाशी बोलताना, बेथानीने खुलासा केला की ती कतार एअरवेजने प्रवास करणार आहे, जिथे ड्रायफ्रुट्स मिळतील. तिला याची अॅलर्जी आहे. आता तुम्ही म्हणाल की तिने मग ते खाऊ नये. पण तिला फक्त खाल्ल्याने नाही तर हवेतून पसरणारी ऍलर्जी आहे. याचा अर्थ असा की जर ड्रायफ्रुट्समधील घटक हवेत उडले किंवा त्यांना त्याचा वास आला तर तिची ऍलर्जी सक्रिय होते आणि तिला अॅनाफिलेक्टिक शॉक येऊ शकतो, ज्यामुळे तिचा श्वास थांबू शकतो किंवा तिच्या हृदयाचे ठोके थांबू शकतात.
तिला वयाच्या चौथ्या वर्षापासून ही ऍलर्जी आहे. जेव्हा ती तिच्या हनिमूनची योजना आखत होती, तेव्हा तिला वाटलं नव्हतं की ही ऍलर्जी तिच्यासाठी अडथळा ठरेल. पण जेव्हा त्याला कळलं की विमान कंपनी विमानात ड्रायफ्रुट्स देणार आहेत, तेव्हा ती घाबरली.
अरे देवा, हे काय! 8 वर्षांच्या मुलाने ऑनलाईन ऑर्डर केली अशी गोष्ट, सगळे धक्क्यात
आपला प्रवास सोपा आणि आनंददायी करण्यासाठी, तिने कतार एअरवेजशी संपर्क साधला आणि त्यांना त्याच्या अॅलर्जीबद्दल माहिती दिली. तिने विमान कंपनीला प्रवाशांना याबाबत सर्वांना माहिती देण्याची विनंती केली. याआधीही तिने काही विमानातून प्रवास केला तेव्ह अशी घोषणा केली आहे. पण कतार कंपनीने स्पष्ट केलं की ते असं काहीही करू शकत नाहीत. तिनं विचारलं की ती स्वतः हे सांगू शकते का? ज्यावर कंपनीनं तिला सांगितलं की जर तिने तसं केलं तर तिला विमानातून खाली उतरवलं जाईल.
विमान कंपनीने तिला आगाऊ तयारी करून येण्याचा सल्ला दिला. आजूबाजूला प्रवाशांशी बोला, खिडकीजवळची सीट घ्या किंवा कोणाशी तरी ती बदला. आपत्कालीन परिस्थितीत ऍलर्जी टाळण्यासाठी वापरला जाणारा एपिपेन सोबत आणा, हँड सॅनिटायझर, फेस वाइप्स वापरा आणि तुमची उर्वरित औषधं सोबत आणा.
आता ती हनीमून ट्रिप रद्द करण्याचा विचार करत आहे कारण तिला कोणत्याही अडचणीत अडकायचं नाही.