औरेया येथील राधा आणि झाशीतील प्रेम प्रकाश. दोघांची मैत्री होती. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या कुटुंबानेही याला मान्यता दिली. 3 वर्षांपूर्वी राधा आणि प्रेम प्रकाश यांचं लव्ह मॅरेज झालं. लग्नाच्या 3 वर्षानंतंर कपलचं आनंदी वैवाहिक आयुष्य एका टॉवेलने उद्ध्वस्त केलं आहै. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
advertisement
10 सेकंदाच्या मिठीने सगळं उद्ध्वस्त केलं! बड्या कंपनीच्या सीईओच्या आयुष्यात मोठी उलथापालथ
मिळालेल्या माहितीनुसार राधा आणि तिच्या पतीमध्ये मोबाईलवर रील पाहण्यावरून वाद झाला होता. शनिवारी संध्याकाळी तिचा प्रेम प्रकाश शेतातून घरी आला. तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. त्यावेळी पत्नी राधा बेडवर झोपली होती. ती मोबाईलवर रील पाहत होती. आंघोळ केल्यानंतर प्रेम प्रकाशने पत्नी राधाकडे टॉवेल मागितला. बराच वेळ झाला तरी राधाने टॉवेल आणला नाही. प्रेम प्रकाशत रागातच बाथरूमबाहेरआला. यावेळी त्याने पाहिले की राधा रील पाहत होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
रागाच्या भरात प्रेम प्रकाशने राधाच्या कानाखालली लगावली असं सांगण्यात येत आहे. राधाला याचा राग आला आणि ती विष प्यायली. कुटुंबीयांनी तिला झाशी मेडिकल कॉलेजमध्येही नेलं. पण तिचा मृत्यू झाला.
हे पदार्थ खाऊन ज्या महिलेशी संबंध, तिचा मृत्यू, इराण-इस्राइल-तुर्कीहून भारतात आला तो नाश्ता
मृताच्या बहिणीने सांगितलं की, राधा आणि तिच्या पतीमध्ये वाद झाला होता. आम्ही तिला शांत राहण्यासही समजावून सांगितलं होतं. पतीसोबत टॉवेलवरून वाद झाला आणि त्याने तिला मारहाण केली. सध्या मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे, असं वृत्त यूपी तकने दिलं आहे.