TRENDING:

सासू गुपचूप उघडायची सुनेचं पार्सल, महिलेने शिकवला धडा, ऑर्डर केली अशी वस्तू, संपूर्ण कुटुंब धक्क्यात

Last Updated:

Daughter in law revenge Mother in law : परवानगीशिवाय पार्स उघडणाऱ्या सासूला सुनेनं अशी अद्दल घडवली की या महिलेच्या बदला घेण्याच्या पद्धतीचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : एकत्र कुटुंबात राहण्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेही. त्यापैकीच एक तोटा म्हणजे कोणत्याच गोष्टी वैयक्तिक किंवा खासगी राहत नाहीत. अगदी कुणाचं पार्सलही. एखाद्याचं कुरिअर किंवा पार्सल आलं तर बऱ्याचदा कुणीही ते सर्रासपणे उघडतं. अशाच एका कुटुंबातील सासू जी तिच्या सुनेचं पार्सल तिला न विचारता उघडायची. सुनेला याचा राग आला आणि तिने सासूला धडा शिकवायचं घडवलं. यासाठी तिने असं सामान ऑर्डर केलं की सासू काय संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
advertisement

महिलेने स्वतः ही संपूर्ण कहाणी सोशल मीडियावर सांगितली आहे. रेडिटवर शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये महिलेनं सांगितलं की तिची सासू प्रत्येक वेळी तिच्या परवानगीशिवाय तिच्या नावाचं पार्सल कसं उघडायची आणि तिनं आपल्या सासूच्या या सवयीला वैतागून असं काही केलं की लोक याला बदला म्हणत आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

मृत बहिणीची अंगठी तरुणीने स्वतःकडे ठेवली, भावाने ती गर्लफ्रेंडला दिली, नंतर घडलं असं की...

advertisement

महिलेनं सांगितलं, "माझ्या सर्व पार्सलवर माझं नाव स्पष्टपणे लिहिलेलं असायचं. पण माझ्या सासूने माझ्या मोठ्या कायदेशीर वस्तू असलेला एक बॉक्सदेखील उघडला. याबाबत विचारलं असता तिने माझ्या सासऱ्यांचं पार्सल असावं असं वाटल्याचं उत्तर दिलं. पण त्यांच्यासाठी मी फक्त एक लहान पॅड केलेला लिफाफा ऑर्डर केला होता. तिला माहित होतं की ती काय करत आहे."

advertisement

म्हणून महिलेने असा मार्ग शोधला जो तिच्या सासूला नेहमीच लक्षात राहिल. तिनं असं सामान ऑर्डर केलं की सासू काय संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.

महिलेने सांगितलं की तिच्या घराबाहेर आधीपासून एक सुरक्षा कॅमेरा बसवलेला होता. तिचं पार्सल फक्त पाच स्टॉप अंतरावर असल्याची सूचना तिच्या फोनवर मिळताच ती खिडकीजवळ बसली आणि डिलिव्हरी व्हॅनची वाट पाहत होती. पार्सल पोर्चवर पडताच मला त्याचा आवाज ऐकू आला. मग माझ्या सासूच्या जलद पावलांचा आवाज आला. ती दाराकडे धावली, तिनं पार्सल उचललं आणि ती तिच्या रूममध्ये गेली. मग शांतता पसरली. मी यापूर्वी कधीही अशी शांतता अनुभवली नाही. 15 मिनिटांनंतर मी कुत्र्याला घेऊन जात होते तेव्हा तोच पार्सलचा बॉक्स लिव्हिंग रूमच्या टेबलावर उघडा पडलेला दिसला. कोणीही ते लपवत नव्हतं. कोणीही त्याबद्दल बोललं नाही. तो फक्त तिथंच पडला होता. तेव्हापासून माझ्या सासूने एकही शब्द काढला नाही.

advertisement

लव्ह मॅरेज केलेलं कपल फक्त एका टॉवेलसाठी भांडलं अन् नको तेच घडलं, हसता खेळता संसार उद्धवस्त

आता महिलेनं असं काय ऑर्डर केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. तिने सगळ्यात मोठं, वेगवान आणि सगळ्यात भयानक खेळणं जे प्रौढांसाठी बनवण्यात आलं होतं. म्हणजेच तिनं अडल्ट टॉय मागवलं होतं. तेही रात्रीच्या वेळी शिपिंगसह. बॉक्सवर तिचं नाव स्पष्टपणे लिहिलेलं होतं.

advertisement

महिलेच्या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. काही युझर्सनी आपल्याही स्टोरी शेअर केल्या आहेत. एका युझरसने आपले सासू-सासरेही आपली पत्रं असेच उघडत असल्याचं सांगितलं, तर दुसऱ्या युझरने आपण आपल्या वहिनीला धडा शिकवण्यासाठीही असंच काहीतरी केल्याचं सांगितलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

तुमच्या घरात असं कोणी आहे का? तुम्ही यावर काय उपाय केला? किंवा तुमच्या आयुष्यात असं कुणी असेल तर तुम्ही काय कराल? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
सासू गुपचूप उघडायची सुनेचं पार्सल, महिलेने शिकवला धडा, ऑर्डर केली अशी वस्तू, संपूर्ण कुटुंब धक्क्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल