आजच्या डिजिटल युगात लोक पटकन प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करत असतात. दिल्ली मेट्रोने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने असंच काहीसं केलं की तुम्ही विचारही केला नसेल. त्यामुळेच हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कपल मेट्रोत बसलं आहे. त्यांच्या आजूबाजूला तसं कुणी प्रवासी दिसत नाही. पण समोर कुणीतरी त्यांचा व्हिडीओ काढतो आहे.
advertisement
डिलिव्हरी बॉय चक्क घोड्यावरुन करतोय डिलिव्हरी, Video पाहून बसणार नाही विश्वास
तरुणीच्या हातात कोल्ड ड्रिंकची बाटली आणि तरुणाच्या हातात बुट आहे. तरुणी कोल्ड ड्रिंकची बाटली उघडून ती त्या बुटात ओतते आणि तरुण त्यात स्ट्रॉ टाकतो. नंतर दोघंही त्या बुटात ओतलेली कोल्डड्रिंक स्ट्रॉनं पिताना दिसतात. हा बूट तसा नवाही नाही. म्हणजे त्या तरुणाच्या पायातील आहे. त्याच्या एका पायात बूट आहे तर दुसऱ्या पायातील बूट हातात आहे, ज्यातून ते कोल्डड्रिंक पित आहेत.
'अशी होती लग्नाची पहिली रात्र', नवविवाहित कपलनं सोशल मीडियावर शेअर केला आपला 'तो' VIDEO
कपलचं हे कृत्य पाहून अनेकांना उलटी आली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझरनी यांना पकडा आणि मारा असं म्हटलं आहेत तर एका युझरने आता देवसुद्धा तरुण पिढीच्या या दिखाऊ वेडेपणासाठी काही करू शकत नाही, असं म्हटलं आहे.
@SachinGuptaUP एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.