'अशी होती लग्नाची पहिली रात्र', नवविवाहित कपलनं सोशल मीडियावर शेअर केला आपला 'तो' VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
कपलचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
मुंबई : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा असा क्षण. लग्नातील काही क्षण असे असतात की ते सर्वांसोबत शेअर करण्यात आनंद असतो पण काही क्षण असे असतात जे पती-पत्नीचे खासगी असतात. असाच क्षण म्हणजे लग्नाची पहिली रात्र. पण एका कपलनं मात्र आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ थेट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. ज्यामुळे सोशल मीडिया नुसतं ओपन केलं तरी देखील तिथं आपल्याला लग्नाशी संबंधित कितीतरी व्हिडीओ दिसतील. लग्नाचे विधी म्हणून नका, हळद म्हणू नका, मेहंदी म्हणून नका, संगीत म्हणू नका, वरात म्हणू नका... लग्नाच्या कितीतरी कार्यक्रमांचे व्हिडीओ. त्यातील काही इमोशनल तर काही मजेशीरही असतील. पण लग्नाशी संबंधित हा व्हिडीओ पाहिल्यावर मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण हा नवविवाहित कपलच्या लग्नाच्या पहिल्याचा रात्रीचा व्हिडीओ आहे.
advertisement
लग्नाची पहिली रात्र कपलसाठी खास असते. पण म्हणून कुणी ती सोशल मीडियावर शेअर करत नाही. पण या कपलने तेच केलं. त्यांनी आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीत काय काय केलं हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं. आपला रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. लग्नाची पहिली रात्र अशी सेलिब्रेट केली, असं कॅप्शनसुद्धा त्यांनी या व्हिडीओला दिलं.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नववधू आपले दागिने काढताना दिसते आहेत. इतक्यात नवरदेव येतो तोसुद्धा तिला तिचा शृंगार उतरवण्यात मदत करतो. हे सर्व करत असताना मध्ये मध्ये त्यांचा रोमान्सही सुरू आहे.
हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @Toxicity____ एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तसा जुना आहे, पण लग्नाच्या या सिझनमध्ये तो पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.
advertisement
Puri Unboxing post karna tha pic.twitter.com/i40KupAEwk
— Berlin (@Toxicity_______) November 27, 2023
काहींनी या व्हिडीओची मजा घेतली आहे. पण अनेकांना हे आवडलं नाही. हा त्या दोघांचा खूप खासगी वेळ होता. जो त्यांनी असा चार चौघात शेअर केला, जे अनेकांना पटलेलं नाही. ज्यामुळे लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.
Location :
Delhi
First Published :
January 01, 2024 11:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
'अशी होती लग्नाची पहिली रात्र', नवविवाहित कपलनं सोशल मीडियावर शेअर केला आपला 'तो' VIDEO