Reason Of Age Gap In Marriage : लग्नासाठी नवऱ्याचं वय बायकोपेक्षा जास्त का असावं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Reason Of Age Gap In Marriage : आपल्या कायद्यातही मुलींचे लग्नाचे वय किमान 18 वर्षे आणि मुलांसाठी 21 वर्षे आहे. यामागे ही आहे कारण...
लग्नाबद्दल प्रत्येक जाती-धर्मामध्ये वेगवेगळ्या मान्यता आहे. तसेच वेगवेगळ्या पद्धतींच्या चालिरीती प्रचलित आहेत. पण या सगळ्यात एक गोष्ट कॉमन आहे किंवा वारंवार सांगितली जाते ती म्हणजे नवरा आणि बायकोमधील वयाचं अंतर. ज्यामध्ये असं म्हटलं जातं की मुलगा हा नेहमी त्याच्या बायकोपेक्षा वयाने मोठा असावा. अनेक लोक हे पाळतात देखील. तरी हल्लीच्या मॉर्डन युगात अनेकांनी या गोष्टीला न जुमानता लग्न देखील केलं आहे.
परंतु आजही अरेंज मॅरेजमध्ये कुटुंबातील सदस्य मुलाचे वय हे मुलीपेक्षा जास्त असावे, यासाठी प्रयत्न करतात. आपल्या कायद्यातही मुलींचे लग्नाचे वय किमान 18 वर्षे आणि मुलांसाठी 21 वर्षे आहे. यामागे ही आहे कारण...
लग्नाच्या वेळी मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त असावे कारण अनेक विद्वानांच्या मते मुली लवकर मॅचुअर होतात आणि मुले उशीरा. अशा परिस्थितीत जेव्हा मुले मुलींपेक्षा मोठी असतील तेव्हाच दोघांमधील परस्पर समन्वय अधिक चांगला होतो.
advertisement
पैसा ही अशी गोष्ट आहे ज्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. जर तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा मोठा असेल, तर तो तुमच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल. कारण त्याने तुमच्यापेक्षा जास्त काळ काम केले असेल. अशा परिस्थितीत तो तुम्हाला आर्थिक सुरक्षा देऊ शकतो.
वयानुसार अनुभवही वाढत जातो असे म्हणतात. जर तुमचा नवरा बायकोपेक्षा मोठा असेल तर त्याचा अनुभव बायकोपेक्षा चांगला किंवा जास्त असेल. जीवनाचे अनेक टप्पे त्यांने पाहिले असतील. अशा परिस्थितीत त्याच्याकडून सल्ला घेऊन तुम्ही कोणतेही काम सहज करू शकता. त्यांनी केलेल्या चुका तुम्ही कराव्यात असे त्यांना कधीच वाटत नाही. अनेक वेळा समान वयाच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या जोडीदारांसोबत अहंकाराची समस्या उद्भवते.
advertisement
जेव्हा दोन लोक लग्न करतात तेव्हा प्रत्येक गोष्टीत समजसपणा असणे आवश्यक असते. मात्र, अनेकवेळा असे प्रसंग येतात, जेव्हा दोन व्यक्तींची मानसिक पातळी सारखी नसते आणि हेच भांडणाचे कारण बनते. अशा परिस्थितीत जोडीदाराचे मोठे वय नात्यात शहाणपण आणते आणि गैरसमज निर्माण होत नाहीत.
advertisement
नात्यात फक्त प्रेमच नाही तर आदरही खूप महत्त्वाचा असतो. जर तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा वयाने मोठा असेल, तर तुम्ही त्याच्या वयानुसार त्याचा आदर कराल आणि तो तुमचे प्रेम आणि आदर समजू शकेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 28, 2023 6:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Reason Of Age Gap In Marriage : लग्नासाठी नवऱ्याचं वय बायकोपेक्षा जास्त का असावं?









