Ideal age for being parents : आई-बाबा होण्याचं योग्य वय काय? बाळाच्या जन्माबद्दल सायन्स काय सांगतं?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
प्रत्येक गोष्टी करण्याचं एक योग्य वय असतं असं म्हणतात. भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये म्हणून योग्य वेळी लग्न करा योग्य वेळी मुलं जन्माला घाला असा सल्ला वडीलधाऱ्या व्यक्तींकडून नेहमी दिला जातो. परंतू सध्याची पिढी करिअर सेट करण्यासाठी या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. तर अनेकवेळा लग्नाचं वय होण्याच्या आधीच विवाह केला जातो आणि नकळत्या वयातच मुल देखील जन्माला घातलं जात. तेव्हा आई वडील होण्याचं योग्य वय काय याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या मते, पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी मूल होण्याचे सर्वोत्तम वय 20 ते 30 वर्षे आहे. हा कालावधी प्रजननासाठी उत्तम मानला जातो. महिलांमध्ये वयाच्या 30 नंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. तसेच, गर्भधारणा करणे खूप धोकादायक बनते. 35 ते 45 वर्षांच्या दरम्यान प्रजनन क्षमता आणखी कमी होते.
advertisement
जर पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर 30 वर्षांनंतर शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ लागते. वयाच्या 35 वर्षानंतर वडील बनणे अधिक कठीण होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही पुरुष वयाच्या 60 व्या वर्षीही वडील बनू शकतात, परंतु हे आवश्यक नाही की त्यांचे शुक्राणू 30 वर्षांच्या युवकांप्रमाणे जनुकीयदृष्ट्या निरोगी असतील.
advertisement
अशीच गोष्ट स्त्रियांनाही लागू होते. वयाच्या तिशीनंतर अंड्यांचा दर्जा हा 20 ते 30 वर्षांच्या स्त्रियांचा असतो तसा राहत नाही. रजोनिवृत्तीनंतर स्त्रिया माता होऊ शकत नाहीत हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. रजोनिवृत्तीचे सरासरी वय 51 वर्षे आहे. तज्ञ म्हणतात की बहुतेक स्त्रियांमध्ये, रजोनिवृत्तीच्या आधीच्या वर्षांत हार्मोन्समध्ये लक्षणीय घट होते, ज्यामुळे आई होण्याची शक्यता कमी होते.
advertisement
हंगेरीतील सेमेलवेइस विद्यापीठातील संशोधकांच्या मते, मूल होण्याचे सर्वात सुरक्षित वय 23 ते 32 वर्षे असते, कारण या वयात काही जन्मजात आजार होण्याची शक्यता कमी असते. सेमेलवेइस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मूल होण्याच्या आदर्श वयाच्या तुलनेत जर एखाद्या जोडप्याने 32 वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यावर मूल जन्माला घालण्याची योजना आखली, तर बाळाला अनेक आजार होण्याचा धोका 15 टक्क्यांनी वाढतो. तसेच या प्रक्रियेत आईच्या जीवाला देखील 15 टक्के धोका असू शकतो.
advertisement








