स्वतःच्या लघवीने ही महिला धुते डोळे
नूपुर पिट्टी असे या महिलेचे नाव असून, त्या स्वतःला 'मेडिसीन-फ्री लाईफ कोच' असे म्हणवून घेतात. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला. 'मूत्र डोळे धुण्यासाठी - स्वतःचे नैसर्गिक औषध' असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले होते. व्हिडिओमध्ये नूपुर पिट्टी यांनी सांगितले की, त्या दररोज सकाळी त्यांच्या ताज्या लघवीने डोळे धुतात. यामुळे त्यांचे कोरडे डोळे, डोळ्यांची खाज सुटणे आणि डोळ्यांची लाली कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. नैसर्गिक आणि पर्यायी उपचारांवर असलेल्या त्यांच्या मोठ्या विश्वासाचा हा एक भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
युजर्सने केली प्रचंड टिका, तरीही...
मंगळवारी अपलोड केलेल्या या पोस्टला अवघ्या 24 तासांत दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यावर जोरदार टीका होत असून, कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्यांचा तीव्र अनादर व्यक्त केला असून, काही जणांनी तर वैद्यकीय मदतीची मागणी केली आहे. नूपुर पिट्टी या नेटकऱ्यांच्या कमेंट्सकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्या आपल्या पद्धतीवर ठाम आहेत. मात्र, वैद्यकीय व्यावसायिक आणि ऑनलाइन वापरकर्त्यांनी नुपूर यांना अशा पद्धतींविरोद्ध इशारा दिला आहे. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आणि नुकसान होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
लाईक्स अन् फाॅलोअर्ससाठी हा मार्ग योग्य नाही
पुरस्कार विजेते हेपॅटोलॉजिस्ट डॉ. सिरियाक ॲबी फिलिप्स, जे 'द लिव्हर डॉक' या नावानेही ओळखले जातात, यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, "कृपया तुमच्या डोळ्यात मूत्र टाकू नका. कारण मूत्र निर्जंतुक नसते." एवढेच नाही, तर त्यांनी या प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटले, "हे खूप निराशाजनक आणि भीतीदायक आहे." एक्स (X) प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांनी मात्र 'द लिव्हर डॉक' यांना पाठिंबा दिला आहे. फिलिप्स यांनी नुपूरच्या इन्स्टाग्रामवर थेट जाऊन सल्ला दिला, "तुम्हाला मदतीची गरज आहे. हे सामान्य नाही. जर तुम्हाला सोशल मीडियावरील फॉलोअर्स आणि लाईक्सची लाट अनुभवायची असेल, तर हा मार्ग योग्य नाही."
हे ही वाचा : पैशासाठी वाट्टेल ते! रेकाॅर्ड व्हिडीओ ₹500, लाईव्ह व्हिडीओसाठी ₹2000... स्वीट कपलचा 'धंदा' पाहून चक्रावले पोलीस
हे ही वाचा : अरे बाप रे! शाळेत दारू पिऊन आली चक्क शिक्षिका; कर्मचाऱ्यांशी केलं गैरवर्तन; VIDEO झाला व्हायरल
