जॉलिबी किंवा केएफसीसारख्या बहुतेक फास्ट फूड चेन कचऱ्यातून टाकून दिलेले चिकनचे तुकडे, मांस, भाज्या गोळा करतात. ते धुऊन, चिरून किंवा कापून गरम तेलात तळले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अन्न जितकं जुनं किंवा अधिक कुजलेलं असेल तितकं ते अधिक कुरकुरीत आणि चविष्ट मानलं जातं.
ही डिश बनवण्याची प्रक्रिया सोपी पण घृणास्पद आहे. कचऱ्यातून काढलेलं चिकन किंवा मांस प्रथम गाळ काढून टाकलं जातं. नंतर त्यात लसूण आणि कांदे घालून तळले जातात. कधीकधी ते पारंपारिक फिलिपिनो शैलींमध्ये बनवलं जातं, जसं की कालदेरेटा किंवा अडोबो. मनिलाचे माजी महापौर आणि अभिनेता इस्को मोरेनो, जे स्वतः विसायन समुदायाचे आहेत, म्हणाले की लहानपणी ते देखील उरलेले अन्न तळून ही डिश बनवत असत. पण आता ते फक्त जेवण राहिलेलं नाही, तर ते एक व्यवसाय आहे.
advertisement
आता ही डिश कुठली आणि कुठे मिळते, तर ही डिश आहे पगपग. फिलापाइन्समधील हा पदार्थ. हे डिश मेट्रो मनिलामधील टोंडो, कॅलूकन, पासिग आणि हॅपी लँडसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये सामान्य आहे. येथील हजारो कुटुंबे ज्यांना दररोज 200 पेसोपेक्षा कमी म्हणजे सुमारे 250 रुपये कमाई होते, ते कचरा गोळा करतात, प्लॅस्टिक विकतात आणि पगपगवर जगतात.
पगपगचा इतिहास प्राचीन आहे. त्याची मुळं 1960 च्या दशकात फर्डिनांड मार्कोस यांच्या 21 वर्षांच्या हुकूमशाही राजवटीत आहेत. त्या काळात, देश कर्जात बुडालेला होता आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होती. मध्य विसायसमधील लोक मनिलासारख्या शहरांमध्ये स्थलांतर करू लागले आणि टोंडोसारख्या भागात अनौपचारिक वसाहती स्थापन झाल्या. तिथं कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून प्रोटिनयुक्त कचरा गोळा करण्याची प्रथा सुरू झाली, जी हळूहळू पगपागमध्ये विकसित झाली.
Food History : एकेकाळी औषध म्हणून वापरलं जायचं टोमॅटो केचअप, गंभीर आजारावर उपचार
2008 च्या जागतिक अन्न संकटामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली, ज्यामुळे तांदूळ आणि इतर धान्यांच्या किमती गगनाला भिडल्या. तेव्हापासून, पगपग एक अधूनमधून येणारी वस्तू बनली आहे. आज लहान कुटीर उद्योग अस्तित्वात आहेत जिथं गरीब लोक असा कचरा गोळा करतात, स्वच्छ करतात, प्रक्रिया करतात आणि गरजूंना विकतात. पगपागच्या एका लहान पिशवीची किंमत फक्त काही पेसो आहे, जी संपूर्ण कुटुंबाला पोसण्यासाठी पुरेशी आहे. 2017 च्या एका अहवालात म्हटलं आहे की पगपग व्यवसाय भरभराटीला येत आहे, जो गरिबीची खोली दर्शवितो.