Food History : एकेकाळी औषध म्हणून वापरलं जायचं टोमॅटो केचअप, गंभीर आजारावर उपचार

Last Updated:

Ketchup History : केचअप बहुतेक घराच्या किचनमधील फ्रिजमध्ये दिसेल. पण या केचअपचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटले आपण दररोज सर्रासपणे खात असलेले हे केचअप एकेकाळी औषध होतं.

News18
News18
नवी दिल्ली : टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचअप... बरेच लोक खातात. बर्गर, टिक्कीसोबत किंवा ब्रेडला लावून अगदी काही लोक तर चपातीही केअअपसोबत खातात. लहान मुलांचा तर हा आवडीचा पदार्थ. किती तरी मुलं केचअप असंच चाटून खातात. असं हे केचअप बहुतेक घराच्या किचनमधील फ्रिजमध्ये दिसेल. पण या केचअपचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटले आपण दररोज सर्रासपणे खात असलेले हे केचअप एकेकाळी औषध होतं.
सुमारे 200 वर्षांपूर्वी केचअप औषध म्हणून विकलं जात होतं, अशी माहिती आहे. 1800 च्या दशकाच्या सुरुवातीला मशरूम आणि माशांपासून केचअप बनवलं जात होतं, तर टोमॅटो विषारी मानले जात होते. 1834 मध्ये डॉ. जॉन कुक बेनेट यांनी केचपमध्ये टोमॅटो घालायला सुरुवात केली. टोमॅटोमध्ये अनेक गंभीर आजार बरे करण्याची शक्ती असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे, असा दावा त्यांनी केला.  हिस्ट्री ऑफ यस्टर्डे वेबसाइटनुसार, जॉन लोकांना सांगत की टोमॅटो अतिसार, कॉलरा, कावीळ आणि अपचन यांसारखे आजार बरे करू शकतात. त्यांनी लोकांना टोमॅटो बारीक करून सॉसमध्ये वापरण्यास प्रोत्साहीत केलं.
advertisement
त्यांचं संशोधन प्रमुख अमेरिकन न्यूज पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालं. अलेक्झांडर माइल्स नावाच्या एका व्यावसायिकाने टोमॅटोबद्दलचा हा दावा वाचला आणि त्याला बिझनेस आयडिया सुचली. माइल्स त्यावेळी अमेरिकन हायजीन पिल नावाचं पेटंट औषध विकत होता. त्याने जॉनसोबत हातमिळवणी केली आणि टोमॅटो केचअपला स्वतःचं औषध म्हणून विकायला सुरुवात केली, त्याचं नाव ठेवलं एक्सट्रॅक्ट ऑफ टोमॅटे म्हणजेच टोमॅटोचा अर्क. त्याचं औषध आजचं जे केचअप आहे, त्याप्रमाणेच गोळी आणि सिरप दोन्ही स्वरूपात उपलब्ध होतं.
advertisement
केचपची क्रेझ संपूर्ण अमेरिकेत पसरली आणि केचपचा वापर वाढला. इतर अनेक व्यावसायिकांनीही केचअपला औषध म्हणून विकायला सुरुवात केली. पण जेव्हा शास्त्रज्ञांनी संशोधन केलं तेव्हा त्यांना आढळलं की ही फक्त एक अफवा होती. हळूहळू संपूर्ण अमेरिकेत पसरलेली केचअपची क्रेझ अखेर कमी झाली, परंतु या अफवेचा फायदा असा झाला की लोकांना समजलं की टोमॅटो ही विषारी भाजी नाही.
advertisement
आज जेव्हा टोमॅटोवर संशोधन केलं गेले तेव्हा अनेक फायदे आढळले. आज लोकांना समजले आहे की टोमॅटो हृदयरोग आणि कर्करोगासाठी फायदेशीर आहेत. जॉनचे दावे जरी थोडे अतिशयोक्तीपूर्ण होते, तरी ते पूर्णपणे चुकीचे नव्हते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Food History : एकेकाळी औषध म्हणून वापरलं जायचं टोमॅटो केचअप, गंभीर आजारावर उपचार
Next Article
advertisement
ED Raid Baramati : बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठी अपडेट
बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ
  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

View All
advertisement