साबुदाना कसा तयार होतो? उपवासाला लोक आवडिने खातात पण अनेकांना आहे चुकीचा समज
- Published by:Devika Shinde
Last Updated:
. कुणाला वाटतं तो झाडावर लागतो, तर कुणाला वाटतं जमिनीत उगवतो. खरं तर, साबुदाना हे या दोन्हींपैकी काहीच नसून त्याची निर्मिती एक वेगळ्या प्रक्रियेतून होते. आता हे ऐकल्यावर अनेकांना नक्कीच आश्चर्य वाटेल आणि खरंच सबुदाणा कसा आणि कुठून बनतो असा प्रश्न उभा राहिल.
मुंबई : नवरात्री, एकादशी किंवा इतर उपवासांच्या दिवशी लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे साबुदाना. खिचडी, वडा, थालिपीठ किंवा खीर उपवासात याच्या अनेक चवदार रेसिपी बनवल्या जातात. परंतु अजूनही अनेकांना साबुदान्याबद्दल गैरसमज आहेत. कुणाला वाटतं तो झाडावर लागतो, तर कुणाला वाटतं जमिनीत उगवतो. खरं तर, साबुदाना हे या दोन्हींपैकी काहीच नसून त्याची निर्मिती एक वेगळ्या प्रक्रियेतून होते. आता हे ऐकल्यावर अनेकांना नक्कीच आश्चर्य वाटेल आणि खरंच सबुदाणा कसा आणि कुठून बनतो असा प्रश्न उभा राहिल.
साबुदाना कसावा किंवा टॅपिओका नावाच्या मुळभाजीतून तयार केला जातो. कसावा हा जमिनीत उगवणारा कंद आहे. हा कंद आधी स्वच्छ धुऊन त्याचे किस करून स्टार्च वेगळे काढले जाते. या स्टार्चला पाण्यात धुऊन वाळवले जाते. नंतर त्या स्टार्चपासून लहान लहान गोळे तयार करून त्यांना वाफेवर शिजवले जाते आणि उन्हात वाळवले जाते. या प्रक्रियेनंतर तयार होतात पांढरे, पारदर्शक मोत्यासारखे दाणे, ज्यांना आपण साबुदाना म्हणून ओळखतो.
advertisement
साबुदान्यात प्रमुख घटक म्हणजे कार्बोहायड्रेट. त्यामुळे तो शरीराला पटकन ऊर्जा देतो. उपवासात जेव्हा इतर धान्यं खाल्ली जात नाहीत, तेव्हा साबुदाना सहज पचतो आणि पोट भरल्याची जाणीवही देतो. मात्र, त्यात प्रथिनं आणि जीवनसत्त्व फारच कमी असतात. म्हणूनच त्याबरोबर शेंगदाणे, बटाटा, दूध किंवा दही वापरून पोषणमूल्य वाढवलं जातं.
साबुदाना हा ना झाडावर उगवतो ना जमिनीत दाण्यासारखा सापडतो. तो कसावाच्या मुळांपासून मिळणाऱ्या स्टार्चपासून बनतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण उपवासात साबुदाना खिचडी किंवा वडा खाल, तेव्हा लक्षात ठेवा आपल्या ताटात आलेले हे मोतीसारखे दाणे खरंतर कसावाच्या प्रक्रियेतून तयार झालेले आहेत. जे एका कंदमुळापासून आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
साबुदाना कसा तयार होतो? उपवासाला लोक आवडिने खातात पण अनेकांना आहे चुकीचा समज