Kitchen Jugaad : दूध नाही दुधीपासून बनवा पनीर, कसं, पाहा Recipe Video

Last Updated:

How to make paneer from bottle gourd : दुधी ही एक भाजी. ज्यापासून तुम्ही भाजी, हलवा, पराठा असे पदार्थ बनवले असतील. पण दुधीपासून पनीर हे तर एकदमच नवीन आहे.

News18
News18
पनीर कसं बनतं, असं विचारलं तर साहजिकच प्रत्येकाचं उत्तर असेल दूध. पनीर म्हणजे दुग्धजन्स पदार्थ, दुधापासून बनलेला. पण दुधीपासूनही पनीर बनवता येऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? काय, हे कसं शक्य आहे? वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. दुधीपासून पनीर कसा बनवायचा हा किचन जुगाड एका महिलेने दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
दुधी ही एक भाजी. ज्यापासून तुम्ही भाजी, हलवा, पराठा असे पदार्थ बनवले असतील. पण दुधीपासून पनीर हे तर एकदमच नवीन आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त एका दुधीपासून तब्बल एक किलो पनीर तुम्ही बनवू शकता असा दावा या व्हायरल व्हिडीओत करण्यात आला आहे. आता दुधीचं हे पनीर बनवायचं कसं ते पाहुयात.
advertisement
अर्धा दुधी घ्या. दुधीच्या साली सोलून घ्या. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. मिक्सरमध्ये पेस्ट करून गरज असेल तरच थोडं पाणी टाका. पेस्टमध्ये दुधीचे तुकडे बिलकुल नसावेत. ही पेस्ट एका भांड्यात टाकून घ्या. यात अर्धा कप तांदळाचं पीठ किंवा मैदा टाका. यामुळे दुधीच्या पेस्टमध्ये पनीरला बायडिंग आणि सॉफ्टनेस मिळेल. एक चमचा मिल्क पावडर टाका. पनीरला थोडा गोडवा येईल. थोडंसं मीठ आणि एक चमचा दही टाका. चिमूटभर खाण्याचा सोडा टाका. पानी न टाकता सगळं मिश्रण एकत्र करा.
advertisement
आता एक प्लेट घ्या. त्याला तेल लावून घ्या. दुधीचं तयार केलेलं मिश्रण या प्लेटमध्ये पसरवून घ्या.15 मिनिटं हे मिश्रण स्टिम करून घ्या. थंड झालं की त्याच्या पनीरसारख्या वड्या कापून घ्या. याची चव एकदम पनीर किंबहुना त्यापेक्षा जास्त चांगली आहे, खाल्ल्यावर कुणाला कळणारच नाही हे दुधाचं नाही तर दुधीचं पनीर आहे, असा दावा या महिलेने केलं आहे.
advertisement
आता हे पनीर वापरून तुम्ही पनीरपासून बनवले जाणारे पदार्थ बनवू शकता. या व्हिडीओतही महिलेने दुधीच्या पनीरपासून एक पदार्थ बनवून दाखवला आहे, तुम्ही तो ट्राय करू शकता.
तुम्ही ही जुगाडू रेसिपी करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना : हा लेख व्हायरल व्हिडीओतील माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Jugaad : दूध नाही दुधीपासून बनवा पनीर, कसं, पाहा Recipe Video
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement