मृतदेह जळत असताना घडतात भयंकर गोष्टी
असं म्हटलं जातं की, विद्युत दाहिनीत मृतदेह जाळताना तो हलतो आणि त्यातून आवाज येतात, ज्यामुळे मृतदेहाला 'जीवन' मिळालं आहे असं वाटतं. खरं तर, विद्युत दाहिनीमध्ये मृतदेह उच्च तापमानावर (800-1000 अंश सेल्सिअस) जाळला जातो. ही प्रक्रिया लाकडाच्या चितेपेक्षा वेगवान आणि पर्यावरणासाठी कमी हानिकारक मानली जाते. पण या दरम्यान काही गोष्टी घडतात, ज्या भयंकर असतात.
advertisement
तज्ञांच्या मते, जेव्हा मृतदेह भट्टीत ठेवला जातो, तेव्हा उष्णतेमुळे शरीरातील स्नायू आणि ऊती पावतात. यामुळे शरीरात थोडी हालचाल किंवा पटके येऊ शकतात, ज्यामुळे मृतदेह 'उठत' असल्यासारखं दिसतो. याव्यतिरिक्त, शरीरातील द्रव आणि वायू उष्णतेमुळे वाफ होऊन बाहेर पडतात, ज्यामुळे स्फोट झाल्यासारखे किंवा रडल्यासारखे आवाज येतात. हे आवाज ऐकून लोक घाबरतात आणि मृतदेहाला 'जीवन' मिळाल्याचं समजलं जातं. पण ही एक अफवा आहे.
अशी असते प्रक्रिया...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये विद्युत दाहिनीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यात आली होती. लाकडी चितेवर मृतदेह पूर्णपणे राख होतो, परंतु विद्युत भट्टीत असं होत नाही. उष्णतेमुळे मांस जळून जातं आणि फक्त हाडं शिल्लक राहतात, जी नंतर एका मशीनमध्ये (क्रेमेशन) बारीक करून पावडर केली जातात. ही पावडर अस्थिकलशात भरली जाते, ज्याला लोक राख मानतात.
वैज्ञानिक सत्य काय?
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, विद्युत दाहिनीतील हालचाली आणि आवाज पूर्णपणे नैसर्गिक आहेत. मृत्यूनंतर शरीरात कोणतीही चेतना नसते आणि या हालचाली उष्णतेमुळे स्नायूंच्या आकुंचनामुळे होतात. न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह यांच्या मते, "मृत्यूनंतर शरीरात प्राण नसतात, पण उष्णतेमुळे रासायनिक आणि भौतिक बदल होतात, ज्यामुळे असे गैरसमज निर्माण होतात." तरीही, ही प्रक्रिया लोकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात, भीती आणि अंधश्रद्धा निर्माण करते, जिथे याला 'चमत्कार' किंवा 'अलौकिक' घटना मानले जाते.
हे ही वाचा : सातवी नापास 'मँगो मॅन'! एकाच झाडावर पिकवल्या 350 आंब्याच्या जाती; 84 वर्षीय आजोबांनी केला चमत्कार, वाचा सविस्तर...
हे ही वाचा : कोल्ड्रिंक्स बाटलीच्या झाकणात 'गोल रबर' कशासाठी असतो? 90% लोकांना माहिती नसेल याचं उत्तर!
