TRENDING:

Do You Know : ज्याच्याकडे मेंदू नाही, तोच निघाला सर्वात हुशार, 'या' जीवाबद्दल वैज्ञानिकांचा थक्क करणारा शोध

Last Updated:

वैज्ञानिकांच्या नव्या संशोधनात आता उघड झालं आहे की हा जीव संपूर्ण शरीर हे जणू “मेंदू”सारखं काम करतं. म्हणजेच त्यांच्या शरीरात वेगळा मेंदू नसला तरी त्यांचा प्रत्येक भाग विचार करण्याची क्षमता ठेवतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : समुद्राच्या तळाशी दिसणारे काटेरी लहान जीव सी अर्चिन हे दिसायला साधे पण स्वभावाने विलक्षण असतात. बाहेरून बघितलं तर हे फक्त एक गोल, काटेरी शेलसारखे वाटतात, पण आतमध्ये निसर्गाने त्यांना अत्यंत गुंतागुंतीची रचना दिली आहे. वैज्ञानिकांच्या नव्या संशोधनात आता उघड झालं आहे की सी अर्चिनचं संपूर्ण शरीर हे जणू “मेंदू”सारखं काम करतं. म्हणजेच त्यांच्या शरीरात वेगळा मेंदू नसला तरी त्यांचा प्रत्येक भाग विचार करण्याची क्षमता ठेवतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

बर्लिनच्या Natural History Museum मधील जीवशास्त्रज्ञ जॅक उलरिच-लूटर आणि त्यांच्या टीमने हे संशोधन केलं आहे. त्यांच्या मते, सी अर्चिनकडे मानव किंवा इतर प्राण्यांप्रमाणे स्वतंत्र मेंदू नसतो, पण त्यांचं nervous system (मज्जासंस्था) संपूर्ण शरीरभर पसरलेली असते. हाच सिस्टम त्यांना प्रतिसाद देण्याची, प्रकाश ओळखण्याची आणि हालचाली नियंत्रित करण्याची क्षमता देतो.

उलरिच-लूटर म्हणतात की ही शोध आपली जुनी समजूत मोडून काढते की फक्त मोठे किंवा बुद्धिमान प्राणीच विचार करू शकतात. आता हे सिद्ध झालं आहे की मेंदू नसलेले प्राणीही गुंतागुंतीचा विचारक्षम प्रणाली विकसित करू शकतात.

advertisement

कोण आहेत हे अद्भुत जीव?

सी अर्चिन हे Echinodermata या समुद्री कुटुंबातील जीव आहेत. याच गटात स्टारफिश, सी ककंबर आणि ब्रिटल स्टार हे जीवही येतात. या जीवांची एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे वयाबरोबर त्यांचा शरीराचा आकार पूर्णपणे बदलतो. लहानपणी त्यांचा शरीररचना दोन समान भागांत विभागलेली असते, पण वाढत असताना त्यांचा आकार गोलाकार बनतो. हे रूपांतर आजही वैज्ञानिकांसाठी कोडं आहे.

advertisement

या जीवांचं शरीर म्हणजेच डोकं

शोधकांनी जांभळ्या रंगाच्या सी अर्चिनवर अभ्यास केला. निष्कर्ष असा होता की त्यांचं संपूर्ण शरीर “सिरसदृश” म्हणजे डोक्यासारखं आहे. त्यांच्याकडे शरीराचा स्वतंत्र धड (torso) नसतो. इतर प्राण्यांमध्ये शरीराचा मधला भाग तयार करणारे जीन्स, सी अर्चिनमध्ये फक्त आतल्या अवयवांतच कार्यरत असतात. जसे की आतडी आणि पाण्याच्या नलिका. ह्याच नलिका त्यांना चालायला, श्वास घ्यायला आणि अन्न पचवायला मदत करतात.

advertisement

मानवांसारखे न्यूरॉन

अभ्यासात आढळलं की सी अर्चिनच्या शरीरात शेकडो प्रकारचे neuron cells असतात. त्यांपैकी काही पेशी “हेड जीन्स” दाखवतात, तर काही पेशींत असे जीन्स आढळले जे मानवी मेंदूतसुद्धा असतात. म्हणजेच सी अर्चिनचं nervous system हे फक्त पेशींचं जाळं नाही, तर एक पसरलेला “मेंदू” आहे जो त्यांच्या प्रत्येक भागातून कार्य करतो.

advertisement

प्रकाशाची जाणही असते

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, 7 लाख रुपयांची कमाई
सर्व पहा

संशोधकांनी हेही शोधलं की सी अर्चिनच्या अनेक पेशींना प्रकाशाची संवेदना असते. त्यांच्या शरीरातील काही भाग मानवी डोळ्याच्या retina सारखे दिसतात. यामुळे स्पष्ट होतं की हे जीव प्रकाशानुसार आपलं वर्तन बदलतात. काही पेशींमध्ये दोन वेगवेगळे light receptors सापडले, ज्यामुळे हेही समजतं की सी अर्चिनना प्रकाश ओळखण्याची आणि त्यानुसार प्रतिसाद देण्याची क्षमता अत्यंत प्रगत आहे.

मराठी बातम्या/Viral/
Do You Know : ज्याच्याकडे मेंदू नाही, तोच निघाला सर्वात हुशार, 'या' जीवाबद्दल वैज्ञानिकांचा थक्क करणारा शोध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल