डॉक्टरांवरही धुरंधरचा फिव्हर चढला आहे. हॉस्पिटलमध्ये एक महिला डॉक्टर धुरंधर फिल्ममधील रहमान डकैत म्हणजे अक्षय खन्नासारखी एंट्री मारताना दिसली आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना डॉक्टरने आपला हा अनोखा अंदाज दाखवला आहे. तिच्यासोबत इतर डॉक्टरही दिसत आहेत.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडतो. समोर दिसतात ते काही डॉक्टर ज्यांच्यात एक महिला डॉक्टर पुढे आहे, जिने डोळ्यांना गॉगल लावला आहे. मागे धुरंधर फिल्मचं फसला गाणं ऐकू येतं. ज्यावर अक्षय खन्नाने एंट्री घेतली आहे. अगदी त्याच पद्धतीने ही महिला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये एंट्री घेते आणि इतर डॉक्टर तिला साथ देतात.
advertisement
Dhurandhar : अक्षय खन्नाचं 'धुरंधर'मधील Fa9la Song, उच्चारतात फसला मग S ऐवजी 9 का?
brutimes इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार धुरंधर फिल्मच्या फसला गाण्यावर थिरकणाऱ्या या डॉक्टरचं नाव आयुषी चौधरी आहे. राजस्थानमधील जयपूरच्या पर्पल हिरोईन रुग्णालयातील हे दृश्य आहे.
व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने तर धुरंधर नाही डॉक्टरेंध्र असं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, त्यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
Ukhana Video : लालबागची बबली आणि जोगेश्वरीचा बंटी! सोशल मीडियावर तुफान व्हायरल कपलचा भन्नाट उखाणा
धुरंधरमधील Fa9la म्हणजेच फसला हे गाणं एक वर्ष आधीच 6 जून 2024 रोजी युट्युबवर रिलीज झालं होतं. बहरीनचा हिपहॉप आर्टिस्ट, रॅपर फ्लिपराचीच्या युट्युब चॅनेलवर हे गाणं आहे. जे त्यानेच गायलं आहे. गाण्याच्या क्रेडिटवरून ते त्यानेच लिहिलं आहे, असंही दिसतं. हे गाणं प्रोड्युस आणि मिक्स केलं आहे. डीजे आऊटलॉने ज्याचं खरं नाव मोहम्मद अलमोहरी आहे. तो डीजे म्युझिक प्रोड्युसर आणि साऊंड इंजिनीअर आहे. पण त्यावेळी या गाण्याचा फक्त ऑडिओ ट्रॅक आला होता. धुरंधर फिल्ममध्ये या ऑडिओ ट्रॅकला व्हिझुल मिळाले.
