Ukhana Video : लालबागची बबली आणि जोगेश्वरीचा बंटी! सोशल मीडियावर तुफान व्हायरल कपलचा भन्नाट उखाणा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Married Couple Marathi Ukhana : बहुतेक नवरदेवांना तुम्ही भाजीत भाजी मेथीचा हा उखाणा घेताना पाहिलं असेल. पण या नवरदेवाने मात्र उखाण्यावर फार मेहनत घेतल्याचं दिसतं आहे. त्याचा उखाणा ऐकून नवरीबाईही थक्क झाली आहे.
लग्न झालं नवरा नवरीला घेऊन सासरी गेला की सगळ्यांचे कान टवकारलेले असतात ते त्यांचा उखाणा ऐकण्यासाठी. सोशल मीडियावरही उखाण्याचे असे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक उखाण्याचा व्हिडीओ. लालबागची बबली आणि जोगेश्वरीच्या बंटीचा हा उखाणा. इतका भन्नाट की तो तुफान व्हायरल होतो आहे.
उखाणा घेणं म्हणजे कित्येक पुरुषांसाठी परीक्षेचा पेपर देण्यासारखं... एखादा उखाणा पाठ करून ठेवायचा, ऐनवेळी तोही आठवत नाही मग आपला मेथीचा उखाणा ठरलेला. बहुतेक नवरदेवांना तुम्ही भाजीत भाजी मेथीचा हा उखाणा घेताना पाहिलं असेल. पण या नवरदेवाने मात्र उखाण्यावर फार मेहनत घेतल्याचं दिसतं आहे. मेथीची भाजी सोडा, त्याने कोणता रेडीमेड उखाणाही घेतला नाही. तर स्वतःचा हटके असा उखाणा तयार करून त्याने घेतला आहे. त्याचा उखाणा ऐकून तर नवरीबाईही थक्क झाली. तीसुद्धा पाहतच राहिली.
advertisement
आता असा या नवरदेवाने काय किंवा कोणता उखाणा घेतला हे ऐकण्यासाठी तुमचेही कान आतुरले असतील. तर ऐका... नवरदेव म्हणतो, शिवराज यादव चाळ, दुर्गा नगर, जोगेश्वरी 60, रूम नंबर 1; दरवाजाला अडकवली घंटी, शिवानीचं नाव घेतो ती माझी बबली मी तिचा बंटी.
advertisement
@sudesh_nawar_vlogs इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा इन्स्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करताना बबली weds बंटी असं कॅप्शन दिलं आहे. तर व्हिडीओवर लालबागची बबली meets जोगेश्वरीचा बंटी असं लिहिलं आहे. तसंच नवरदेवाचा उखाणा संपल्यावर जेव्हा नवरीचा उखाणा घेण्याचा टर्न येतो तेव्हा सगळे आता लालबाग, असं ओरडताना दिसतात. यावरून नवरदेव जोगेश्वरीचा आणि नवरीबाई लालबागची आहे, हे समजतं.
advertisement
advertisement
त्यानंतर नवरीबाई उखाणा घेते, पण नवरदेवाच्या उखाण्यासमोर नवरीचा उखाणा काहीच वाटत नाही. तुम्हाला हा लालबागची बबली आणि जोगेश्वरीच्या बंटीचा उखाणा कसा वाटला? आवडला का? तुम्ही तुमच्या लग्नात कोणता उखाणा घेतला होता? किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने असा काही भन्नाट उखाणा घेतला होता का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 13, 2025 3:26 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Ukhana Video : लालबागची बबली आणि जोगेश्वरीचा बंटी! सोशल मीडियावर तुफान व्हायरल कपलचा भन्नाट उखाणा











