Husband Wife : नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही, अहोही म्हणायचं नाही, मग चारचौघात काय बोलायचं? हे घ्या पर्याय

Last Updated:
Husband Wife Relationship : बऱ्याचदा असं होतं की फॅमिली फंक्शन, गावी वगैरे गेलो आणि नवऱ्याला नावाने हाक मारलं की वडीलधारी माणसं ओरडतात, अहो म्हणायला सांगतात. पण तुम्हाला अहो म्हणायचं नसतं. आम्ही तुमच्यासाठी असे पर्याय आणले आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचं आणि इतरांचं मन राखत नवऱ्याला आदराने हाक मारू शकता.
1/9
तुम्ही पाहिलं असेल बहुतेक महिला आपल्या नवऱ्यांना अहो म्हणतात. लग्न झालं की नवऱ्याला अहो म्हणायची पद्धत आपल्याकडे आहे. पूर्वी नवरा बायकोपेक्षा मोठा असायचा शिवाय लग्नाआधी ते एकमेकांना ओळखतही नसत. त्यामुळे चारचौघात नवऱ्याचं नाव कसं घ्यायचं, म्हणून अहो अशी हाक मारली जायची.

advertisement
2/9
आता लव्ह मॅरेज होतात. पती-पत्नी आधीपासूनच एकमेकांना ओळखत असतात, तेव्हा नावाने हाक मारायची सवय झालेली असते. शिवाय दोघांचं वयही जवळपास सारखं असतं. त्यामुळे बहुतेक महिला नवऱ्याला अहो म्हणत नाहीत तर नावानेच हाक मारतात.

3/9
पण तुम्ही पाहिलं असेल, वडीलधारी मंडळी आजूबाजूला असतील, कोणत्या कार्यक्रमाला गेला, गावी गेलात आणि नवऱ्याला नावाने हाक मारली की नवऱ्याला नावाने हाक मारायची नाही, असं सांगतात. पण मग अहोही म्हणायचं नसतं. अशावेळी चारचौघात नवऱ्याला अहो न म्हणता आणि त्याचं नावही न घेता, मोठ्यांनाही पती पत्नीला आदराने हाक मारते, असं वाटायला हवं, यासाठी आम्ही काही पर्याय आणले आहेत.

4/9
तुम्ही नवऱ्याला थेट अहो म्हणण्यापेक्षा ऐका ना, इकडे बघा जरा, थोडं इकडे या, एक मिनिट, जरा सांगा, ते बघा ना, आपण जाऊया का? आपल्याला बोलायचं होतं असं बोलू शकता.

5/9
हेसुद्धा तुम्हाला जुनं वाटत असेल तर कूल किंवा मॉडर्न टोनमध्ये Gen z style तुम्ही Excuse me, Hello, One sec, Listen, Hey इकडे या, आपण बोलूया?, Time आहे का? Listen nam, Wait इकडे या, Just a minute, Come here असे शब्द वापरू शकता.

6/9
अगदी ओळखीची, जवळची माणसं असतील तर त्यांच्यासमोर तुम्ही साहेब, मालक, Boss, Hero, Driver साहेब असे मजेशीर शब्द वापरू शकता.

7/9
कधी कधी शब्दांची गरजच नसते, इशाराही पुरेसा असतो. अशावेळी तुम्ही हलकासा हात दाखवणं, डोळ्यांनी इशारा, जवळ जाऊन हळूच बोलणं, फोनवर मेसेज किंवा कॉल करू शकता.

8/9
अगदी फॉर्मल म्हणजे आपण थोडं बाहेर जाऊया, एक मिनिट, जरा बोलायचं होतं, इकडे येऊ शकता का, आपल्याला वेळ आहे का, Can we talk, One moment please असं बोलू शकता.

9/9
याशिवाय तुम्हाला आणखी काही पर्याय माहिती असतील, तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंवा तुमची बायको तुम्हाला चारचौघात आदराने काय बोलते ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (सर्व फोटो : AI Generated)

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement