ऑफिसमध्ये कर्मचारी गायब झाल्यानंतर सापडलेली चिठ्ठी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. रेडिटवर u/cheeseballgag नावाच्या युझरने या चिठ्ठीचा फोटो टाकला आहे. त्याने त्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्याबाबतचा एक विचित्र किस्सा सांगितला आहे. त्याने पोस्टमध्ये सांगितल्यानुसार त्याचा हा सहकारी ब्रेकसाठी म्हणून बाहेर गेला होता. पण शिफ्ट पूर्ण करण्यासाठी तो परतलाच नाही. जाण्यापूर्वी त्याने साध्या पानावर हाताने चिठ्ठी लिहिली.
advertisement
चिठ्ठीत काय लिहिलं होतं?
'इथं मॅनेजर म्हणून प्रवास चांगला राहिला आहे पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याशी मी सहमत नाही. माझा सर्वात मोठा आक्षेप असा आहे की मला आळशी म्हटलं गेलं. मी इथं सर्वात विश्वासार्ह मॅनेजर होतो आणि तरीही मला आळशी आणि बदलीयोग्य म्हटलं गेलं. आज मी ठरवलं आहे की 20 जून हा माझा शेवटचा दिवस असेल.'
अचानक बिघडली तरुणीची तब्येत, शरीरातून मेलेल्या उंदरासारखा वास, रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात
या पत्रातील स्पष्टवक्त्याने सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधले. काहींनी कर्मचाऱ्याच्या स्पष्टवक्त्याचं कौतुक केलं, तर काहींनी मधेच नोकरी सोडण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की राजीनामा देऊन अचानक नोकरी सोडलेल्या या कर्मचाऱ्याला एका महिन्यानंतर त्याच कंपनीने पुन्हा नियुक्त केलं.
कायदेशीररित्या राजीनामा देणं योग्य आहे, पण...
न्यूजवीकच्या वृत्तानुसार, रोजगार वकील केल्सी झॅमेट यांच्या मते, अमेरिकेतील बहुतेक राज्यांमध्ये 'इच्छेनुसार' रोजगार धोरण आहे. याचा अर्थ असा की कर्मचारी किंवा नियोक्ता दोघांनाही नोकरी सुरू ठेवण्याचं कोणतंही कायदेशीर बंधन नाही. म्हणजेच, कोणताही करार किंवा युनियन करार नसल्यास कोणीही कधीही राजीनामा देऊ शकतो किंवा काढून टाकलं जाऊ शकतं.
पण त्यांनी असंही म्हटलं की, 'कायदेशीररित्या राजीनामा देणं योग्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की कोणतेही परिणाम होणार नाहीत. अचानक नोकरी सोडल्याने व्यावसायिक प्रतिमा खराब होऊ शकते, भविष्यात त्याच कंपनीत काम करण्याच्या संधी मर्यादित होऊ शकतात आणि संदर्भ देखील गमावू शकतात." काही प्रकरणांमध्ये, विशेषतः सुरक्षा किंवा जबाबदारी आवश्यक असलेल्या नोकऱ्यांमध्ये, जर कर्मचारी योग्य हस्तांतरण न करता नोकरी सोडतो तर त्याच्यावर धोरण उल्लंघनाचा आरोप देखील केला जाऊ शकतो.
