advertisement

सासू-सुनांची 'तूतूमैमै' थांबणार! सासू-सुनांमध्ये पहिल्यांदाच 'शांतीबाँड', कोर्टाचा निर्णय, नेमका आहे तरी काय?

Last Updated:

Daughter In law Mother in law : महिलेच्या मुलाचं 14 फेब्रुवारी 2024, वॅलेंटाईन डेच्या दिवशीच त्यांचं लग्न झालं. लग्न कोणत्याही अडचणी, वादाशिवाय पार पडलं. पण लग्नानंतर मात्र सगळंच बदललं.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
भोपाळ : सासू-सूनेचं नातं म्हणजे घरोघरी मातीच्या चुली असंच. क्वचितच काही प्रकरणं सोडली तर सगळ्या घरात सासू-सूनेचं नातं सारखंच. दोघींचं एकमेकांशी कधीच पटत नाही. आता तर चक्क कोर्टानेच सासू-सुनांच्या तूतू-मैमैमध्ये मध्यस्थी करत मोठा निर्णय दिला आहे. सुनांना सासूपासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे. पण कोर्टाने असा आदेश का दिला? नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया.
मध्य प्रदेशच्या इंदौरमधील एका प्रकरणात इंदौर जिल्हा कोर्टाने हा निकाल दिला आहे. इंदौरच्या खजराना येथील पीपल चौकात राहणारी साधना (नाव बदललेलं) जिच्या मुलाचं लग्न एअरहॉस्टेस असलेल्या अनिता (नाव बदललेलं) वर प्रेम होतं. 14 फेब्रुवारी 2024, वॅलेंटाईन डेच्या दिवशीच त्यांचं लग्न झालं. लग्न कोणत्याही अडचणी, वादाशिवाय पार पडलं. पण लग्नानंतर मात्र सगळंच बदललं.
advertisement
लग्नानंतर सुनेकडून सासऱ्यांचा छळ
साधनाचा मुलगा बायको अनितासोबत तिच्या माहेरी महूमध्ये राहू लागला. त्याने आईवडिलांकडे येणंही कमी केलं. आईवडिलांपासून तो दुरावत गेला. मुलानेच आपल्यासोबत नातं ठेवलं नाही म्हणून साधनानेही 26 सप्टेंबर 2024 ला मुलगा आणि सून दोघांसोबत संबंध तोडले. त्यांना आपल्या संपत्तीतून बेदखल केलं. मुलानेही आईवडिलांच्या घरी जाणं बंद केलं.
advertisement
काही कालावधीनंतर साधनाचा मुलगा आणि सुनेत वाद सुरू झाला. मुलाने बाययकोचं घर सोडलं आणि कुठेतरी निघून गेला. दोघांची कोर्टात घटस्फोटाची केस सुरू झाली.  नवरा गेल्यानंतर सुनेनं सासूसासऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. 27 मे 2025 रोजी अनिताने सासू साधना आणि तिच्या पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार करत केस केली. इतकंच नव्हे तर ती सासूला फोन आणि व्हॉट्सअपवर धमक्याही देऊ लागली. खोट्या प्रकरणात फसवण्याचा इशारा देऊ लागला.
advertisement
पोलिसात गेली सासू
6 ऑगस्ट 2025 ला सायंकाळी 5 च्या सुमारास अनिता सासूच्या घरी गेली. तिच्यासोबत तिची आई आणि एक मुलगा होता. तिने सासूला दरवाजा उघडायला सांगितलं पण तिनं उघडला नाही म्हणून ती जबरदस्ती दरवाज्याला धक्का देऊन आत घुसली. सासूसोबत धक्काबुक्की केली. त्यानंतर तिला घराबाहेर काढलं.
पीडित सासूने पोलिसात धाव घेतली. सायंकाळी 5 वाजता ती पोलिसात पोहोचली पण पोलिसांनी रिपोर्ट घेतला नाह. ती पुन्हा घरी आली. अनिता, तिची आई आणि त्यांच्यासोबत आलेला मुलगा रात्री 8 पर्यंत साधनाच्याच घरी होते. त्यांनी तिच्याशी वाद घातला, शिवीगाळ केली आणि धमकी देऊन मुख्य दरवाजाला टाळं लावलंय  साधनाने अनिताकडे चावी मागितली पण तिने दिली नाही आणि टाळंही उघडलं नाही. रात्रभर साधना आणि तिचा नवरा घरात बंद होते. सकाळी घराच्या मालकाने कसंबसं करून दोघांना घरातून बाहेर काढलं.
advertisement
सासूची कोर्टात धाव
शेवटी सुनेच्या छळाला वैतागलेली साधना कोर्टात गेली. घराच्या दरवाज्याचं कुलूप काढण्याची आणि सुनेला तिच्या नातेवाईकांना घरात येण्यापासून रोखावं अशी मागणी केली. याचिकेत तिने आपण आपल्या मुलगा आणि सुनेला प्रॉपर्टीतून आधीच बेदखल आहे, तरी सून घरी येऊन त्यांना त्रास देत असल्याचं सांगितलं.
advertisement
महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. सासूच्या घराच्या आसपासच्या लोकांशी चौकशी केली. त्यांचा जबाब घेतला. सासूसुनेचाही जबाब घेतला. अधिकाऱ्याने सासू घरगुती हिंसेने पीडित असल्याचा रिपोर्ट दिला. या रिपोर्टच्या आधार इंदौर जिल्हा कोर्टाने निर्णय घेतला.
साधनाची केस लढणारे वकील आशिष शर्मा यांनी सांगितलं की, कोर्टाने सासूला न्याय दिला. सुनेला सासूपासून दूर राहण्याचा आणि हिंसा न करण्यासाठी बाँड भरण्याचा आदेश देण्यात आला. सासूला व्हॉट्सअॅप मेसेज करायचा नाही आणि घरात घुसून हंगामा करायचा नाही, असेही आदेश दिले आहेत.  हा आदेश कायदेशीरच नाही तर सामाजिकरित्याही एक आदर्श आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सासू-सुनांची 'तूतूमैमै' थांबणार! सासू-सुनांमध्ये पहिल्यांदाच 'शांतीबाँड', कोर्टाचा निर्णय, नेमका आहे तरी काय?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement