पुरुष म्हणून जन्मलेली काजल, होते 2 बॉयफ्रेंड, स्त्री दिसण्यासाठी मुंबईत चेहऱ्याची सर्जरी आणि भयंकर घडलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man become Woman : पुरूषी लिंगासह जन्मलेल्या काजलला 'किन्नर' म्हटलं जाणं आवडत नव्हतं. तिला तिचं आयुष्य पूर्णपणे स्त्रीसारखं जगायचं होतं. यासाठी तिने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून चेहऱ्याची महागडी सर्जरी करून घेतली केली, जेणेकरून तिचा चेहरा आणि हावभाव पूर्णपणे महिलांसारखे व्हावेत.
नवी दिल्ली : मुलीचा मुलगा किंवा मुलाची मुलगी झाल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशीच एक ट्रान्स महिला काजल... जिचा जन्म पुरुष म्हणून झाला, म्हणजे तिचं लिंग पुरुषाचं होतं. पण तिला पूर्ण महिला व्हायचं होतं. तिच्या आयुष्यात 2-2 बॉयफ्रेंड होते. त्यांच्यासाठी महिलेसारखं दिसावं म्हणून तिने मुंबईत लाखोंची चेहऱ्याची सर्जरी करवून घेतली. त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते भयंकर आहे.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील ही घटना आहे. 25 वर्षांची ट्रान्स महिला काजल आणि तिचा 12 वर्षांचा भाऊ देव मूळचे मैनपुरी जिल्ह्यातील होते. एक महिन्यापूर्वी दोघंही खाडेपूर येथील एका निवृत्त सैनिकाच्या घरात भाड्याने राहू लागले.
काजलची आई गुड्डीने सांगितलं की, त्यांच्या मुलीचा मोबाईल फोन गेल्या 4-5 दिवसांपासून बंद होता. अनेक वेळा फोन करूनही संपर्क होत नव्हता, त्यामुळे तिला संशय आला. शनिवारी ती काजलच्या घरी पोहोचली तेव्हा घर बंद होतं. तिच्याकडे घराची डुप्लिकेट चावी होती, ज्याने तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आतून तीव्र वास येत होता. आत जाताच तिला देवचा मृतदेह बेडजवळ दिसला, तर काजलचा मृतदेह बेडखाली एका बॉक्समध्ये भरलेला आढळला. तिने लगेच पलिसांना कळवलं.
advertisement
प्रेम आणि दरोड्याचा संशय
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसीपी चिंत्राशु गौतम यांनी सांगितलं की घरातील वस्तू विखुरलेल्या होत्या, कपाट उघडं होतं, काजलचा आयफोन गायब होता. घटनास्थळावरून दारूची रिकामी बाटली देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, ही हत्या 3 ते 5 दिवसांपूर्वी झाल्याचं दिसतं. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे गोळा केले आहेत, ज्यामध्ये बोटांचे ठसे, रक्ताचे डाग आणि संशयास्पद साहित्याचा समावेश आहे.
advertisement
प्राथमिक तपासात प्रेमप्रकरण, दरोडा यांचा संशय व्यक्त केला जात आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, गोलू आणि आकाश हे दोन तरुण काजलच्या घरी वारंवार येत असत. काजलचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, तर दुसरा तरुणही तिच्या जवळचा होता, ज्यामुळे लव्ह ट्रँगलचा संशय अधिकच वाढला आहे. तर गुन्ह्याच्या ठिकाणाची स्थिती, लुटलेल्या वस्तू आणि मृताच्या नात्याची पार्श्वभूमी पाहता हे प्रकरण लव्ह ट्रँगल आणि दरोडा या दोन्हीशी संबंधित असू शकतं.
advertisement
गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या रिकामी दारूची बाटलीवरून असंही दिसून येतं की घटनेच्या वेळी आरोपी तिथं बसून दारू पित होते. काही वाद किंवा परस्पर भांडणानंतर ही घटना घडली असण्याची शक्यता आहे.
आज तकच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, भाजप महिला नेत्याच्या घरी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काजलच्या घराचा बाहेरचा भाग दिसतो. घटनेच्या वेळी घरात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना ओळखण्यासाठी पोलीस त्या फुटेजची तपासणी करत आहेत.
advertisement
फिल्मी होतं काजलचं आयुष्य
पोलिस सूत्रांनी आणि काजलच्या ओळखीच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, तिचं आयुष्य एखाद्या फिल्म स्टोरीपेक्षा कमी नव्हतं. पुरूषी लिंगासह जन्मलेल्या काजलला 'किन्नर' म्हटलं जाणं आवडत नव्हतं. तिला तिचं आयुष्य पूर्णपणे स्त्रीसारखं जगायचं होतं. यासाठी तिने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून चेहऱ्याची महागडी सर्जरी करून घेतली केली, जेणेकरून तिचा चेहरा आणि हावभाव पूर्णपणे महिलांसारखे व्हावेत. शस्त्रक्रियेनंतर काजल तिच्या नवीन लूकसह सोशल मीडियावर सक्रिय राहू लागली आणि एक महिला म्हणून तिची ओळख निर्माण करू लागली.
advertisement
स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की काजलची आर्थिक परिस्थिती चांगली होती. तिच्याकडे महागडा मोबाईल, बँडेड कपडे आणि इतर वस्तू होत्या. तिने शस्त्रक्रिया आणि आलिशान जीवनशैलीवर खूप पैसे खर्च केले होते. तर काही लोक असंही म्हणतात की ती मित्र आणि ओळखीच्या लोकांकडून पैसे उधार घेत असे.
advertisement
फॉरेन्सिक तपास अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर पोलीस संशयितांवर ठोस कारवाई करण्याची तयारी करत आहेत. गोलू आणि आकाशशी संबंधित माहिती देखील गोळा केली जात आहे आणि दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 11, 2025 1:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पुरुष म्हणून जन्मलेली काजल, होते 2 बॉयफ्रेंड, स्त्री दिसण्यासाठी मुंबईत चेहऱ्याची सर्जरी आणि भयंकर घडलं


