advertisement

OMG! समुद्रात सोडला कॅमेरा, 4 किमी खोलवर दिसलं असं काही, शास्त्रज्ञही थक्क झाले

Last Updated:

Camera in ocean : एका प्रयोगाचा भाग म्हणून शास्त्रज्ञांनी समुद्रात सुमारे 4 किलोमीटर खोलीवर एक रिमोट कॅमेरा पाठवला. यादरम्यान त्या कॅमेऱ्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : आपल्या पृथ्वीवर एक असं जग आहे, जे इतर कोणत्याही ग्रहापेक्षा कमी नाही आणि ते म्हणजे समुद्राची अमर्याद खोली. त्यातील बहुतेक भाग अजूनही मानवांच्या आवाक्याबाहेरचं रहस्य आहे. या जगाचं रहस्य जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी समुद्रात सुमारे 4 किलोमीटर खोलवर एक कॅमेरा पाठवला. या काळात कॅमेऱ्यात जे दिसलं त्यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं आहे.
रिमोट कॅमेऱ्याने पाण्याखालील वाहनाद्वारे अनोखा शोध लावण्यात आला आहे. या शोधामुळे केवळ शास्त्रज्ञच नाही तर संपूर्ण जगाला आश्चर्य वाटलं आहे. रिमोट कॅमेऱ्याच्या मदतीने असे अनेक प्राणी कैद झाले आहेत, जे पाहण्यास खूप विचित्र आहेत.
शास्त्रज्ञ समुद्रात एका मोठ्या दरीचा शोध घेत होते, तेव्हा अचानक त्यांना सुमारे 4 किलोमीटर (२.४ मैल) खोलीवर एक गुलाबी रंगाचा प्राणी पोहताना दिसला. या प्राण्याच्या शरीरावर कानाच्या आकाराचे पंख होते, जे तो पोहताना हलवत होता. हे पाहून शास्त्रज्ञही थक्क झाले, कारण ते अगदी डिस्नेच्या प्रसिद्ध कार्टून पात्र 'डंबो'सारखे दिसत होते.
advertisement
advertisement
अर्जेंटिनाच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे 193 मैल अंतरावर दक्षिण अटलांटिक महासागरात असलेल्या मार डेल प्लाटा पाणबुडी कॅन्यनच्या शोध दरम्यान हे फुटेज सापडले . हा प्राणी ग्रिम्पोटेउथिस नावाच्या प्रजातीचा आहे , ज्याला सामान्यतः डंबो ऑक्टोपस म्हणून ओळखलं जातं. या प्रजातीच्या एकूण 17 ज्ञात जाती आहेत. त्या सर्वांची ओळख त्यांच्या डोळ्यांवरून बाहेर पडणाऱ्या पंखांमुळे होते. डंबो ऑक्टोपस हे सर्वात खोल समुद्रातील ऑक्टोपस मानले जातात, जे अत्यंत दाब आणि अतिशीत तापमान असलेल्या वातावरणात राहतात. ते त्यांचे जेलीसारखे शरीर आणि पंख फडफडवून पोहतात.
advertisement
अर्जेंटिनाच्या पाण्यात डंबो ऑक्टोपस दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे, असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे वरिष्ठ क्युरेटर जॉन अबलेट म्हणाले की, डंबो ऑक्टोपस इतर ऑक्टोपसपेक्षा खूप वेगळे असतात. ते खूप मऊ आणि जेलीसारखे असतात, ज्यामुळे त्यांचे स्वरूप एलियनसारखे दिसतं. डंबो ऑक्टोपस सहसा 20 ते 30 सेंटीमीटर पर्यंत वाढतात, परंतु सापडलेला सर्वात मोठा ऑक्टोपस 1.8 मीटर लांब आणि 5.9 किलोग्रॅम वजनाचा होता. 2020 मध्ये देखील हिंदी महासागरात 7000 मीटर खोलीवर डंबो ऑक्टोपस दिसला होता.
advertisement
advertisement
याच मोहिमेत काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी एका डेव्हिल स्टारफिशची देखील नोंद केली होती, जो प्रसिद्ध कार्टून 'स्पंजबॉब स्क्वेअरपँट्स' च्या पॅट्रिक स्टारसारखा दिसत होता. अशा अनोख्या शोधावरून असx दिसून येतx की समुद्राच्या खोलीत अजूनही असंख्य प्राणी लपलेले आहेत, ज्याबद्दल जाणून घेण्यासारखं बरंच काही शिल्लक आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
OMG! समुद्रात सोडला कॅमेरा, 4 किमी खोलवर दिसलं असं काही, शास्त्रज्ञही थक्क झाले
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement