उरले फक्त 100 दिवस, पृथ्वी..., हार्वर्ड शास्त्रज्ञाच्या दाव्याने उडाली खळबळ, कोणतं संकट?

Last Updated:

Aliens on earth in danger : हार्वर्डच्या एका शास्त्रज्ञाचा पृथ्वीबाबतचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

News18
News18
नवी दिल्ली : पृथ्वीचं आयुष्य किती, पृथ्वी कधी नष्ट होणार? पृथ्वीचा अंत कसा होणार? याबाबत बरेच दावे केले जातात. पृथ्वीवर अशा बऱ्याच घटना घडतात ज्यामुळे जगाचा अंत जवळ आला की काय? अशी भीती वाटू लागते. काही भविष्यवक्तांनी पृथ्वीबाबत केलेली भाकितं खरी ठरत असल्याचं दिसल्यानंतर तर धाकधूक अधिक वाढते. याचदरम्यान
एक अज्ञात वस्तू अवकाशात पृथ्वीकडे खूप वेगाने जात आहे. या परग्रही वस्तूबद्दल शास्त्रज्ञ अनेक प्रकारे अंदाज लावत आहेत. त्याला 3 I/ अ‍ॅटलस असं नाव देण्यात आलं आहे. काही शास्त्रज्ञ त्याला धूमकेतू मानत आहेत, तर काही जण त्याला सामान्य खगोलीय पिंड मानत आहेत.  हार्वर्डचे प्राध्यापक अवी लोएब या रहस्यमय वस्तूवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की ते एक एलियन अंतराळयान असू शकतं.जे आपल्याला वाचवू शकते किंवा आपला नाश करू शकतं.
advertisement
प्राध्यापक लोएब यांचा असा विश्वास आहे की ते काही तांत्रिक डिझाइनचे परिणाम असू शकतं.  त्यांनी या वस्तूची तुलना आर्थर सी क्लार्क यांच्या 'रेंडेझव्हस विथ रामा' या कादंबरीशी केली आहे, ज्यामध्ये एक रहस्यमय परग्रही वस्तू एक परग्रही अंतराळयान असल्याचं दिसून आलं आहे. ही अज्ञात वस्तू 1 जुलै रोजी सापडली आणि लोएब यांनी इशारा दिला आहे की जर ते परग्रही जहाज असेल तर ते प्रोब किंवा शस्त्र देखील घेऊन येऊ शकतं.
advertisement
त्यांनी भाकीत केले आहे की हे यान 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान पृथ्वीवर पोहोचू शकते. गेल्या वेळी दिसलेल्या 100 मीटर लांबीच्या एलियन ऑब्जेक्टपेक्षा हा सुमारे 200 पट मोठा आहे. प्रोफेसर लोएब म्हणतात की इतक्या मोठ्या ऑब्जेक्टचे दिसणं तज्ज्ञाना गोंधळात टाकण्यास पुरेसं आहे.
advertisement
ते म्हणाले, "राहण्यायोग्य ग्रहांवर प्रोब तैनात करण्याच्या परिस्थिती अशा कोणत्याही वाहनासाठी परिपूर्ण आहेत. ते आपल्याला वाचवू शकते किंवा नष्ट करू शकते. आपण दोन्ही शक्यतांसाठी तयार असले पाहिजे आणि सर्व बाह्य वस्तू फक्त खडक आहेत याची खात्री केली पाहिजे.
नासानेही या रहस्यमय वस्तूचे अस्तित्व मान्य केलं
नासाच्या मते, ही वस्तू ताशी 1,35,000 मैल वेगाने आतील सौर मंडळाकडे जात आहे. नासाने म्हटलं आहे की ही वस्तू 30 ऑक्टोबरच्या रात्री सूर्याच्या सर्वात जवळ असेल, परंतु आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण ती अजूनही 130 दशलक्ष मैल दूर आहे. पण त्याच्या अंतरामुळे शास्त्रज्ञ त्याचा अचूक आकार मोजू शकत नाहीत, परंतु असा अंदाज आहे की तो सुमारे 20-40 किमी आहे.
advertisement
इतर शास्त्रज्ञ काय म्हणतात?
पण सर्व शास्त्रज्ञ त्यांच्याशी सहमत नाहीत. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ ख्रिस लिंटॉट यांनी त्यांच्या दाव्यांचे वर्णन पूर्णपणे मूर्खपणा असं केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की एलियन प्रोबचा सिद्धांत हा ऑब्जेक्ट समजून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या रोमांचक कामाचा अपमान आहे. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने या ऑब्जेक्टला एलियन धूमकेतू म्हटलं आहे.
advertisement
लोएब यांनीदेखील कबूल केलं की हा धूमकेतू असू शकतो. पण तरीही अधिक संशोधनाला वाव आहे, कारण तो अंतराळयान असण्याची थोडीशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न कायम आहे की तो फक्त एक महाकाय धूमकेतू आहे की तो विश्वाच्या इतर संस्कृतीने पाठवलेला संदेश आहे? शास्त्रज्ञ त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
मराठी बातम्या/Viral/
उरले फक्त 100 दिवस, पृथ्वी..., हार्वर्ड शास्त्रज्ञाच्या दाव्याने उडाली खळबळ, कोणतं संकट?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement