तुम्हाला माहितीय का जर असं घडलं तर संपूर्ण मानवजातीसाठी विनाशकारी ठरू शकतं आणि हे स्वत: सायन्सनं सांगितलं आहे. त्यामुळे यापासून बचावासाठी आपल्याला कोणताच सायन्सचा उपाय वाचवू शकत नाही.
विनाशाची सुरुवात कशी होईल?
पृथ्वी सुमारे 1670 किमी प्रति तास या वेगाने स्वतःभोवती फिरते. आपण हा वेग अनुभवत नाही, कारण आपण पृथ्वीसोबतच फिरत असतो. पण जर ती अचानक थांबली, तर धरतीवरील प्रत्येक वस्तू समुद्र, हवा, इमारती, पर्वतांचा मलबा, गाड्या, आणि माणसंही वेगाने पूर्व दिशेला फेकली जातील. जणू अख्ख्या ग्रहाला एका क्षणात ब्रेक लावला आहे आणि सर्वकाही पुढे ढकललं जात आहे.
advertisement
पृथ्वीच्या फिरण्याने निर्माण होणारी ‘सेंट्रीफ्यूगल फोर्स’ समुद्राला त्यांच्या जागी ठेवते. ही शक्ती निघून गेली की समुद्र एका बाजूला सरकायला लागेल
पहिल्या 24 तासांत काय काय फरक दिसेल?
अनेक खंडांवर 100 मीटरपेक्षा उंच सुनामीं येऊन धडक दिली. आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका कोणताही खंड सुरक्षित राहणार नाही. समुद्र भूमध्यरेषेकडे जाऊन नवी तटीय रेषा तयार करतील. ध्रुवीय प्रदेशातील बर्फाचे वजन वाढून ते आणखी खाली दबतील, दिवस-रात्रांचा समतोल तुटेल. पृथ्वी थांबली तर दिवस 24 तासांचा नसून थेट 6 महिन्यांचा होईल.
ज्या भागावर सूर्य 6 महिने थांबेल, तिथे तापमान 100°C च्या वर जाऊ शकतं, 6 महिने अंधारात राहणाऱ्या भागात तापमान 100°C पर्यंत कोसळेल. अर्धी पृथ्वी आगीत जळेल, तर उरलेली अर्धी बर्फाच्या थराखाली दडून बसेल.
पृथ्वी थांबली तरी वायुमंडळ थांबणार नाही. ते आपल्या गतीने फिरत राहील. हवेला 1700 किमी/ताशी वेग येईल, हा वेग कोणत्याही गोष्टीला क्षणात उडवून लावेल. हे सर्वसामान्य वादळ नाही, तर ‘ग्रहस्तरीय धक्का’ असेल. शहरे, जंगलं, समुद्रकिनारे… काहीच उभं राहणार नाही.
मग कोण जगू शकेल?
विज्ञान सांगतं जर पृथ्वी अचानक थांबली, तर वाचण्याची शक्यता जवळपास शून्य असेल. पण ती हळूहळू थांबू लागली तर काही निवडक प्रदेशात जीवन टिकू शकतं. विशेषतः भूमध्यरेषेपासून दूर असलेले पर्वतीय प्रदेश, भुयारी बंकर, समशीतोष्ण तापमान असलेले पट्टे. वैगरेमधील लोक जिवंत रहातील.
काही वैज्ञानिक मानतात की समुद्राच्या अत्यंत खोल भागातील जीव, ध्रुवीय प्रदेशाच्या बर्फाखालील सूक्ष्मजीव, हे या बदलांना तग धरू शकतील.
