TRENDING:

ऐकाल तर ऐकतंच राहाल! आजीआजोबांनी गायलं मुकेश आणि लता मंगेशकर यांचं हिट गाणं, होतंय तुफान VIRAL

Last Updated:

Elderly Couple Song Video : या वृद्ध दाम्पत्याकडे पाहिलं तर ते अगदी सामान्य दिसतात. असंच काहीतरी साधं गातील असंं वाटतं. पण जसं ते गायला सुरुवात करतात तेव्हा मात्र ऐकणारा प्रत्येक जण थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : एकाच्या समोर हार्मोनियम आणि एकीच्या हातात डफली... असे काही वृद्ध दाम्पत्य तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशनवरही पाहिले असतील. एक सामान्य दाम्पत्य, सामान्य लोकांसारखंच काहीतरी गात असतील असंच त्यांना पाहिल्यावर वाटेल. पण जसं ते गायला सुरुवात करतात, तेव्हा त्यांचं गाणं ऐकून सगळे थक्क होतात. या वृद्ध दाम्पत्याच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
News18
News18
advertisement

व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपं दिसत आहे. त्यांच्यासोबत एक आणखी व्यक्ती आहे. जी त्यांना त्यांच्या गाण्यात मधेमधे साथ देताना दिसते. हार्मोनियमने सुरुवात होते. मध्येच महिला डफली वाजवते आणि सुरू होतात गाण्याचे बोल... सावन का महिना.... लता मंगेशकर आणि मुकेश यांचं हिट गाणं. ज्याला या आजीआजोबांनी नवीन म्युझिक दिलं आहे आणि त्यांच्या वेगळ्या सुरात गायलं आहे.

advertisement

खजिना म्हणून चोराने मोठ्या बॅगेवरच मारला हात, उघडून पाहिलं तेव्हा डोळेच फिरले

हार्मोनियम आणि डफलीच्या म्युझिकवर दोघंही हे गाणं गातात. त्यांनी गाण्याला आपल्या पद्धतीने नवीन म्युझिक दिलं आहे. त्यांचा आवाजही ऐकत राहावा इतका गोड आहे.

हा व्हिडिओ @theprayagtiwari या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वृद्ध दाम्पत्याचे संगीत आणि सूर दोन्ही खूप सुंदर आहेत आणि लोकांची मनं जिंकत आहेत. लाखो लोकांनी तो पाहिला आहे, हजारोंनी लाइक केला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना वृद्ध दाम्पत्याला प्रतिभेचा खजिना म्हटलं आहे. खूप सुंदर, आपला दिवसच कमालीचा झाला, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. एका युझरने प्रतिभेची कमतरता नाही, पण संधी मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. तर एका युझरने यांना संधी मिळाली पाहिजे असं म्हटलं आहे.

advertisement

Taj Mahal : ताजमहालच्या ज्या भागात जायला बंदी तिथंच गेली व्यक्ती, दिसलं असं दृश्य की...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

तुम्हाला हा व्हिडीओ, हे गाणं, या वृद्ध दाम्पत्याचा आवाज कसा वाटला? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
ऐकाल तर ऐकतंच राहाल! आजीआजोबांनी गायलं मुकेश आणि लता मंगेशकर यांचं हिट गाणं, होतंय तुफान VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल